IPL 2024, KKR vs LSG : टॉस कोलकात्याच्या बाजूने, गोलंदाजी घेत श्रेयस अय्यर म्हणाला…
आयपीएल 2024 स्पर्धेतील 28 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर हा सामना होत आहे. दोन्ही संघ विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी धडपड करतील. मागच्या सामन्यात कोलकात्याच्या चेन्नईकडून, तर लखनौचा दिल्लीकडून पराभव झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची या स्पर्धेतील सुरुवात एकदम मस्त झाली होती. सलग तीन सामने जिंकले होते. मात्र चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केल्याने विजयी घोडदौड थांबली. असं असलं तरी गुणतालिकेत कोलकात्याचा संघ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्सही 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना टॉप 4 मधील स्थान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. कोलकात्याचं होमग्राउंड ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. त्यामुळे होमग्राऊंडचा फायदा होतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. नॉस्टॅल्जिक वाटते, गर्दी उत्साहवर्धक आहे आणि आम्ही कोलकाता बाहेर खेळलो आता परत आल्याचा आनंद वाटतो. प्रथम गोलंदाजी म्हणून रिंकू बाहेर जातो, हर्षित राणाला प्लेइंग 11 मध्ये घेतलं आहे.”
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, “मी प्रथम गोलंदाजी केली असती, पण ही खेळपट्टी चांगली दिसते. संघात काही बदल करणं गरजेचं आहे. प्रत्येकजण विश्रांती घेत आहे आणि बरा झाला आहे याची खात्री करणे इतकेच आहे. आज सामन्यात पडिक्कल आणि नवीन-उल-हक आराम दिला आहे. तर शामर जोसेफ आणि दीपक हुडा यांना घेतलं आहे. मोहसीन खानही परत आला आहे.” लखनौ सुपर जायंट्सने आज खास रंगाची जर्सी परिधान केली आहे. प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बागानची ही जर्सी आहे. कोलकात्यातील हा प्रसिद्ध क्लब असून त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मागच्या वर्षीही लखनौने ही जर्सी परिधान केली होती.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णदार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.