IPL 2024 KKR vs RCB Live Streaming : आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, कोलकाताचं आव्हान
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : आरसीबीची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आतापर्यंत कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आता आरसीबीसमोर पुढील सामन्यात केकेआरचं आव्हान असणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 21 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सची धुरा सांभाळणार आहे. तर फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. केकेआरने आतापर्यंत या हंगामातील 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबी सर्वात शेवटी 10 व्या स्थानी आहे. आरसीबीने 7 पैकी 1 सामनाच जिंकला आहे. त्यामुळे आरसीबीला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इथून पुढे प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आरसीबीसाठी आता ‘करो या मरो’ अशी स्थिती असणार आहे.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना केव्हा?
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रविवारी 21 एप्रिल रोजी हा सामना होणार आहे.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना इडन गार्डन, कोलकाता येथे होणार आहे.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजीब उर रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन) यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरून ग्रीन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.