KKR vs SRH : कोलकात्याने हैदराबादला धोबीपछाड देत गाठली फायनल, पराभवानंतर पॅट कमिन्सने सांगितलं कुठे काय चुकलं?

आयपीएल 2024 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्स राखून पराभूत केलं. या सामन्यातील विजयानंतर कोलकात्याने अंतिम फेरी गाठली आहे. तर हैदराबादला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. या सामन्यातील पराभवानंतर पॅट कमिन्स नेमकं काय चुकलं ते सांगितलं.

KKR vs SRH : कोलकात्याने हैदराबादला धोबीपछाड देत गाठली फायनल, पराभवानंतर पॅट कमिन्सने सांगितलं कुठे काय चुकलं?
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 11:17 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वॉलिफायर फेरीत कोलकता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. सामन्याच्या पहिल्या षटकापासूनच कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला बॅकफूटवर ढकललं होतं. मिचेल स्टार्कने ट्रेव्हिस हेडची विकेट घेतली आणि सामन्याचा रंगच बदलून टाकला. त्यानंतर हैदराबादला डोकंच वर काढता आलं नाही. सनरायझर्स हैदराबादचा संघ 19.3 षटकात सर्वबाद 159 धावा करू शकला आणि विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 13.4 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील विजयानंतर कोलकात्याने अंतिम फेरी गाठली आहे. तर हैदराबादला क्वॉलिफायर 2 खेळून अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. दरम्यान संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजींने प्रतिस्पर्धी संघांना बॅकफूटवर ढकलेल्या हैदराबादने क्वॉलिफायर 1 सामन्यात नांगी टाकली. या निराशाजनक कामगिरीची झलक फ्रेंचायसी व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत अंतिम फेरीत कोण येतं याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने पराभवानंतर मन मोकळं केलं आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनने सांगितलं की, “आम्ही प्रयत्न करू. हा पराभव मागे सारून पुन्हा भरारी घेऊ. चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दुसऱ्या क्वॉलिफायर पुन्हा परत येऊ. तुमच्याकडे टी20 क्रिकेटमध्ये असे दिवस असतात जिथे काही गोष्टी फारशा काम करत नाहीत. आम्हाला बॅटने खेळायला हवं होतं तिथे आम्ही हवी तशी कामगिरी केली नाही. त्यामुळे साहजिकच बॉलने फार काही करू शकलो नाही. या विकेटवर अतिरिक्त फलंदाज निवडणं अपेक्षित वाटले. केकेआरने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्ही सर्वांनी पुरेसे क्रिकेट खेळले आहे, आणि नवीन ठिकाणी जाणे देखील आम्हाला मदत करेल. पुढच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.