KKR vs SRH : गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल, त्या एकाच वाक्याची चर्चा, नक्की काय म्हटलं?

Gautam Gambhir IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवत आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. केकेआरच्या या कामगिरीनंतर केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल झालं आहे.

KKR vs SRH : गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल, त्या एकाच वाक्याची चर्चा, नक्की काय म्हटलं?
gautam gambhir kkr ipl 2024Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 12:39 AM

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील क्वालिफायर 1 सामन्यात विजय मिळवत चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. कॅप्टन श्रेयस अय्यर याने सिक्स ठोकून केकेआरला विजयी केलं. केकेआरने विजयासाठी मिळालेलं 160 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरने या विजयासह क्वालिफायर 1 मध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवला. केकेआरच्या या विजयानंतर टीमचं सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे. मुंबईकर कॅप्टन श्रेयस अय्यर याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. केकेआरने अंतिम फेरीत पोहचण्यची कामगिरी मेंटॉर गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात केली. गंभीरने केकेआरच्या या विजयानंतर एक्स(ट्विटर ) पोस्ट केली आहे.

गौतम गंभीरने केकेआरच्या विजयाचे 4 फोटो शेअर केले आहेत. केकेआरचे गोलंदाज आणि फलंदाजांचे हे फोटो आहेत. तसेच केकेआरने या सोशल मीडिया पोस्टला एका वाक्यात कॅप्शन दिलंय. गंभीरने त्याच्या एक्स पोस्टला “Need a purple wave on May 26! Come on KKR fam!”, असं कॅप्शन दिलंय. गंभीरची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

दरम्यान केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली. केकेआरने ही कामगिरी गौतम गंभीरच्या नेतृत्वात केली होती. त्यानंतर आता 2021 नंतर केकेआर पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहचली आहे. आता गंभीर मेंटॉरच्या भूमिकेत आहे. केकेआर 26 मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम फेरीतील दुसरा संघ अजून निश्चित झालेला नाही. आता केकेआर गंभीरच्या नेतृत्वातनंतर मार्गदर्शनात ट्रॉफीवर नाव कोरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मेंटॉर गौतम गंभीरची पोस्ट

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.