KKR vs SRH : राहुल त्रिपाठीचं अर्धशतक, कॅप्टन पॅटची निर्णायक खेळी, केकेआरसमोर 160 धावांचं आव्हान
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Qualifier 1 st Innings In Marathi : राहुल त्रिपाठी याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे आणि अखेरच्या क्षणी कॅप्टन पॅट कमिन्स याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर हैदराबादने 150 पार मजल मारली.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 1 सामन्यात राहुल त्रिपाठी, हेन्रिक क्लासेन आणि कॅप्टन पॅट कमिन्स या तिघांचा अपवाद वगळता सनरायजर्स हैदराबादचे विस्फोटक फलंदाज आणि टीम अपयशी ठरली आहे. साखळी फेरीत आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक विक्रम करणारी हैदराबाद टीम मोठ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध फुस्स ठरली. हैदराबादला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. राहुल त्रिपाठी याची अर्धशतकी खेळी, हेन्रिक क्लासेन याच्या 32 आणि पॅट कमिन्स याच्या फिनिशिंग टचमुळे हैदराबादला सन्मानजनक धावा करता आल्या. राहुलने केलेलं अर्धशतक आणि पॅटच्या 30 धावांमुळे हैदराबादला 159 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता कोलकातासमोर फायनलमध्ये पोहचण्यासाठी 160 धावाचं आव्हान आहे. आता कोलकाता हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करणार की हैदराबादचे गोलंदाज या धावांचा बचाव करणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
राहुल त्रिपाठी याने 35 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्ससह 55 धावांची खेळी केली. हेन्रिक क्लासेन याने 21 चेंडूत 32 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी पॅट कमिन्स याने 24 चेंडूत नाबाज 30 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन आणि पॅट कमिन्स या तिघांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी घोर निराशा केली. ट्रेव्हिस हेड, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार आणि सनवीर सिंह या चौघांना भोपळाही फोडता आला नाही. अभिषेक शर्मा नितीश रेड्डी या दोघांनी अनुक्रमे 3 आणि 9 अशा धावा केल्या. अब्दुल समज याने 16 धावांचं योगदान दिलं. तर वी वैशाखनाथ 7 धावांवर नाबाद परतला.
केकेआरकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. या 6 च्या 6 जणांनी आपलं विकेटचं खातं उघडलं. मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
कोलकाताने हैदराबादला रोखलं
Innings Break!
A sharp effort on the field by Kolkata Knight Riders 👏👏
Chase on the other side ⏳
A place in the final on the line ‼️
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/2gdzlOAi5E
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.