IPL 2024, KKR vs SRH : कोलकाता हैदराबादच्या या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, जाणून घ्या 11 प्लेयर्सबाबत

आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायडर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे हे यावरून दिसून येतं. या सामन्यात काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करू शकतात. जाणून घ्या कोण ते..

IPL 2024, KKR vs SRH : कोलकाता हैदराबादच्या या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, जाणून घ्या 11 प्लेयर्सबाबत
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 11:42 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफमधील क्वॉलिफायर 1 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कोण बाजी मारणार अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे या सामन्यात चमकदार कामगिरी कोण करणार याचीही चर्चा रंगली आहे. दोन्ही संघात तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. त्यामुळे कोण कधी सामन्याची सूत्र फिरवेल सांगता येत नाही. फिल सॉल्टची उणीव कोलकाता नाईट रायडर्सला भासणार यात शंका नाही. कारण कोलकात्याला चांगली सुरूवात करून देण्यात त्याचा हातखंडा होता. मात्र त्याच्या गैरहजेरीत फटका बसू शकतो.

सनरायझर्स हैदराबादचे पाच खेळाडू, तर कोलकाता नाईट रायडर्सचे सहा खेळाडू सामना फिरवू शकतात. सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन ही नावं आहेत. तर कोलकात्याकडून सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग,आंद्रे रस्सेल,मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा ही नावं आघाडीवर आहेत.

पिच रिपोर्ट आणि हवामान

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहमदाबाद 21 मे रोजी कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच पावसाची शक्यता दिसत नाही. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशीच आणि 20 षटकांचा होईल. त्यामुळे क्रीडाप्रेमींना एका सामन्याची पर्वणी मिळेल. दुसऱ्या डावात दव पडू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पण या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारून जिंकू शकतो.कारण वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला खेळपट्टीचा फायदा होऊ शकतो आणि नंतर फिरकीपटू डाव सावरू शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरीन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा.

सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.