IPL 2024 : केकेआर यंदाचं जेतेपद मिळवणार! स्पर्धेत जुळून आला असा योगायोग
आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी चांगली झाली. गुणतालिकेत 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आणखी एक सामना जिंकताच प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. असं सर्व असताना एक योगायोग जुळून आला आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर असंच दिसत आहे.
आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सनंतर कोलकाता नाईट रायडर्सची गाडी सुसाट सुटली आहे. कोलकात्याने आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 14 गुणांसह कोलकात्याचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आणखी एक विजय मिळवताच कोलकात्याचं प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. दुसरीकडे, एक योगायोग जुळून आला आहे. यात कोलकाताच जेतेपद मिळवणार असं दिसून येत आहे. कारण असाच योग काही वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जुळून आला होता. कोलकात्याने साखळी फेरीतील सामन्यात मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. जवळपास 12 वर्षानंतर कोलकात्याने मुंबईला वानखेडेवर पराभूत केलं. असं 12 वर्षांपूर्वी जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन ठरली होती तेव्हा घडलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सने 2012 साली जेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हा कोलकात्याने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं आणि चषक आपल्या नावावर केला होता. दुसरं म्हणजे यंदाची आयपीएल फायनल चेन्नईतच खेळली जाणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा 12 वर्षानंतर हा योगायोग जुळून आला आहे. कोलकात्याचा संघही पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमधील स्थान एका विजयानंतर निश्चित होईल. जर कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत धडक मारली आणि जेतेपदावर नाव कोरलं तर तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरेल. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. तर गौतम गंभीर या संघाचा यंदाच मेंटॉर झाला आहे. यापूर्वी गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्ससोबत होता.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, दुष्मंथा चमीरा, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत.