IPL 2024 तोंडावर असताना टीमला मोठा झटका, ज्याची भीती होती तेच घडलं!
IPL 2024 : क्रिकेट चाहत्यांना आयपीएलची उत्सुकता लागली आहे, थराराला अवघे काही दिवस बाकी असताना चॅम्पियन संघाला मोठा झटका बसला आहे. ज्याची भीती तेच घडलं असून स्पर्धा तोंडावर असताना असं झाल्याने टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : आयपीएल 2024 च्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 15 मार्चला आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सर्व संघांनी जोरदार तयारी केलीये. मात्र अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. एक स्टार खेळाडू हा पूर्ण सीझनमधून बाहेर झाला आहे. टीमसाठी हा मोठा बसला आहे. कारण आयपीएल तोंडावर आली असताना खेळाडू बाहेर झाल्याने टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली आहे. नेमका कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.
आयपीएलच्या तोंडावर टीमला झटका
आयपीएलचं विजेतेपज दोनवेळा जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. टीममधील स्टार खेळाडू जेसन रॉय हा यंदाच्या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी कोलकाताचा कर्णधार असलेल्य श्रेयस अय्यर हा दुखापती झाल्यावर त्याच्या जागी संघात रॉय याला घेण्यात आलं होतं.
🚨 NEWS 🚨
KKR name Phil Salt as replacement for Jason Roy.
Details 🔽 #TATAIPL | @KKRiders https://t.co/KjezlTn4b8
— IndianPremierLeague (@IPL) March 10, 2024
जेसन रॉय आता बाहेर झाल्याने कोलकाता टीमने त्याच्या जागी तगडा बदली खेळाडू घेतला. जेसन रॉय याच्या जागी कोलकाता संघाने फिल साल्ट याची निवड केली आहे. गेल्या सीझमनमध्ये साल्ट हा दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये होता. यंदा झालेल्या लिलावामध्ये त्याला कोणीही बोली लावली नव्हती. अनसोल्ड राहिलेल्या साल्ट याला केकेआरने 1.5 कोटी लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. गेल्या वर्षी याच साल्ट याने टी-20 मध्ये दोन शतके मारली होतीत. महत्त्वाचं म्हणजे गड्याने सलग दोन शतके मारल्याने चर्चेत आला होता.
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल फायनल संंघ 2024 नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (C), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.