KKR vs SRH Final : इशारा की आणखी काही? केकेआरचं फायनलमध्ये पोहचलेल्या हैदराबादसाठी ट्विट, म्हटलं…

IPL 2024 KKR vs SRH Final : सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. त्यानंतर आधीच फायनलमध्ये पोहचलेल्या केकेआरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

KKR vs SRH Final : इशारा की आणखी काही? केकेआरचं फायनलमध्ये पोहचलेल्या हैदराबादसाठी ट्विट, म्हटलं...
srh and kkr shreyas iyerImage Credit source: Original Image : BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 1:05 AM

अखेर 73 सामन्यानंतर 10 संघांमधून आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने आधीच क्वालिफायर 1 मध्ये मंगळवारी 21 मे रोजी सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली होती. तर आता 24 मे रोजी क्वालिफायर 2 सामन्यात विजय मिळवून सनरायजर्स हैदराबाद फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. क्वालिफायर 2 मध्ये सनरायजर्स हैदराबाज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना पार पडला. सनरायजर्स हैदराबादने हा सामना जिंकून 2018 नंतर पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. हैदराबादच्या या विजयानंतर केकेआरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (आधीचं ट्विट) पोस्ट केली आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानला या विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने यासह अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. हैदराबादच्या या विजयानंतर केकेआरने ” And the seats are booked for the Final Showdown! See you on Sunday, @SunRisers” अशी पोस्ट केली आहे. केकेआरने या पोस्टमधून आपण अंतिम फेरीसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय. तर दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांनी या पोस्टचे अनेक अर्थ काढलेत. केकेआरने या पोस्टमधून आपण फायनलसाठी तयार असल्याचा इशाराच दिल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील अंतिम सामना हा 26 मे रोजी चेन्नईतील एम चिंदबरम स्टेडियमध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या अंतिम सामन्याकडे असणार आहे.

हैदराबादच्या विजयानंतर केकेआरची पोस्ट

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.