स्टार्क इज बॅक | शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवली ताकद, शाहरूखसह स्टेडियमकडून कौतुक, पाहा Video

Shahrukh Clap For Mitchell Strac : आयपीएलमधील डबल हेडरमधील सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात केकेआरच्या मिचेल स्टार्कने आपली ताकद दाखवून दिली आहे. शेवटच्या सामन्यात पठ्ठ्याने केलेल्या गोलंदाजीने केकेआरला मोठा फायदा झाला.

स्टार्क इज बॅक | शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवली ताकद, शाहरूखसह स्टेडियमकडून कौतुक, पाहा Video
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 5:57 PM

मुंबई : केकेआर संघाने टॉस जिंकत लखनऊला बॅटींगसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्यांदा बॅटींग करताना लखऊ संघाने 20 ओव्हरमध्ये 161-7 धावा केल्या. यामध्ये निकोलस पूरन याने सर्वाधिक 45 धावा, के. एल. राहुलने 39 धावा केल्या. तर केकेआरकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शेवटच्या ओव्हमध्ये दोन विकेट घेत लखनऊच्या धावसंख्येला ब्रेक लावला. आतापर्यंत झालेल्या आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अरशद इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अर्शद खान याचा कडक बोल्ड काढला.

मिचेल स्टार्क याने आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये 28 धावा देत तीन विकेट घेतल्या.  आपल्या स्पेलमध्ये स्टार्क याने 13 डॉट बॉल्स टाकले. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमक निकोलस पूरन याला पहिल्याच बॉलवर चकतुराईने माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या अरशद खान याला शेवटच्या चेंडूवर बोल्ड केलं. बॅटची कट घेत गेलेला एक चौकार सोडला तर कृणाल पंड्या आणि अरशद यांना स्टार्कने धावा कढू दिल्या नाहीत.

यंदाच्या आयपीएलमध्ये शेवटच्या ओव्हर्समध्ये खोऱ्याने धावा निघत असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र स्टार्कने आपली  ताकद या प्रदर्शनातून दाखवून दिली. आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा ठरलेल्या स्टार्कने संघासाठी आजच्या सामन्यात दमदार प्रदर्शन केलं.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.