IPL 2024 : केएल राहुलला भर मैदानात अपमानित केल्यानंतर संजीव गोयंका यांचा मोठा निर्णय
Sanjiv Goenka KL Rahul Controversy : लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांना केएल राहुलला दिलेल्या वागणुकीमुळे टीकेचा सामना करावा लागतोय. अशात त्यांनी मोठा निर्णय घेतलाय.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनऊ सुपर जायंट्स टीम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊचा 8 मे रोजी 10 विकेट्सने पराभव झाला. लखनऊचा हा पराभव मालक संजीव गोयंका यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. सामन्यानंतर गोयंका यांनी कॅप्टन केएल राहुल याला भर मैदानातच खडेबोल सुनावले. गोयंकांचे चेहऱ्यावरचे हावभाव आणि केएल राहुलसोबत बोलण्याची पद्धत पाहून नेटकरी चांगलेच संतापले. नेटकऱ्यांनी गोयंकांना चांगलंच सुनावलं. त्यांनंतर गोयंकांनी मोठा निर्णय घेतला आहे.
गोयंका केएल राहुलसोबत चुकीचं वागले. गोयंका केएलला भर मैदानात बोलण्याऐवजी बंद खोलीतही बोलू शकले असते, त्यांनी खेळाडूसोबत वागण्याची ही पद्धत योग्य नाही, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी आपल्या विविध मुद्द्यांसह गोयंकांना धारेवर धरलं. काहींनी तर गोयंकांच्या इंस्टावरील विविध फोटोंवर कमेंट करत निशाणा साधला. त्यानंतर गोयंकांनी हैराण होत मोठा निर्णय घेतलाय.
संजीव गोयंका यांनी ट्रोलिंगनंतर इंस्टाग्रामवर कमेंट्स करण्याबाबत मर्यादा घातली आहे. अर्थात आता गोयंका यांच्या इंस्टा फोटोवर प्रत्येकाला कमेंट करता येणार नाही. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल याच्यासोबत झालेल्या वादानंतर गोयंका यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामात एकूण 12 सामने खेळले आहेत. लखनऊने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊच्या खात्यात 12 पॉइंट्स आहेत. तर लखनऊचा नेट रनरेट हा -0.769 इतका आहे.
संजीव गोयंकांकडून इंस्टाग्राम कमेंट्सवर नियंत्रण
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.