IPL 2024 : लखनऊ विरुद्ध विस्फोटक खेळी, धोनीने रचला इतिहास, मोठा रेकॉर्ड ब्रेक
M S Dhoni LSG vs CSK IPL 2024 : महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. धोनीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 28 धावांच्या खेळीसह कीर्तीमान केला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 20 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्ससह 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. धोनीने केल्या या 20 धावाच निर्णायक ठरल्या. चेन्नईने मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी मिळालेल्या 207 धावांचा पाठलाग करताना 186 धावांपर्यंत मजल मारता आली. धोनीने मुंबईनंतर आता लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धही फिनिशिंग टच देत शानदार 9 बॉलमध्ये 18 धावांची नाबाज खेळी केली. धोनीने यासह एक कीर्तीमान केला आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.
धोनीने 9 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्ससह 311.11 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 28 रन्स केल्या. धोनीने यासह विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. धोनी अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. तसेच धोनीने एबी डीव्हीलियर्स याचा रेकॉर्ड ब्रेक केला. धोनीने एबीचा आयपीएलमधील धावांचा विक्रम मोडला. एबीच्या नावावर आयपीएलमध्ये 5 हजार 162 धावा केल्यात. तर धोनीच्या नावावर 257 सामन्यांमध्ये 5 हजार 169 धावा आहेत. धोनी आधी एबी एकमेव विकेटकीपर होता ज्याने 5 हजार धावा केल्या.
महेंद्रसिंह धोनीचा महारेकॉर्ड
Another Milestone for MSD 🫡
5000 runs in IPL as a wicket-keeper 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/Wq40tK7FpW
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
दरम्यान धोनी आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारा एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. धोनीच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि विराट कोहली या फलंदाजांनी 5 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथीराना.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकुर.