IPL 2024 LSG vs DC : दिल्लीचा शानदार विजय, लखनऊवर 6 विकेट्सने मात
IPL 2024 LSG vs DC Highlights In Marathi : दिल्ली कॅपिट्ल्सने अखेर सलग 2 पराभवानंतर विजय मिळवला आहे. लखनऊवर 6 विकेट्सने मात करणाऱ्या दिल्लीला विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्येही फायदा झाला आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सने सलग 2 पराभवानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. लखनऊने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दिल्लीने 170 धावा केल्या. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर कॅप्टन ऋषभ पंत याने विजयात 41 धावांचं योगदान दिलं.
जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 35 बॉलमध्ये 55 धावा केल्या. ऋषभने 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 41 धावा ठोकल्या. ओपनर पृथ्वी शॉ याने 22 मध्ये 32 धावांचं योगदान दिलं. डेव्हिड वॉर्नर 8 धावांवर आऊट होऊन परतला. तर ट्रिस्टन स्टब्स आणि शाई होप या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. स्टब्स आणि होप या दोघांनी अनुक्रमे नाबाद 15 आणि 11 धावा केल्या. तर लखनऊकडून रवी बिश्नोई याने 2 विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक आणि यश ठाकुर या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
लखनऊची बॅटिंग
दरम्यान त्याआधी लखनऊने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. लखनऊकडून अनकॅप्ड इंडियन आयुष बदोनी या युवा फलंदाजाने 35 बॉलमध्ये 55 धावांची सर्वाधिक नाबाद खेळी केली. तर अर्षद खान याने नॉट आऊट 20 रन्स केल्या. तर त्याआधी कॅप्टन केएल राहुल याने 22 बॉलमध्ये 39 धावा केल्या. तर इतरांना खास काही करता आलं नाही. दिल्लीकडून कुलदीप यादव याने 3 आणि खलील अहमद याने 2 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्मा आणि मुकेश कुमार या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
स्ट्रब्सचा विनिंग शॉट
Victory in Lucknow for the @DelhiCapitals 🙌
A successful chase power them to their second win of the season as they win by 6⃣ wickets!
Scorecard ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/6R7an9Cy8g
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि यश ठाकुर.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.