IPL 2024, LSG vs GT : लखनौने जिंकला नाणेफेकीचा कौल, फलंदाजी घेत केएल राहुल म्हणाला…
आयपीएल स्पर्धेतील 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना गुणतालिकेवर बराच इम्पॅक्ट टाकणारा आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि फलंदाजी निवडली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 21वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत चारवेळा दोन्ही संघ भिडले आहेत. चारही वेळेस गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्ससमोर गुजरातला पराभूत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. शुबमन गिल विजयाची पुढे ढकलतो, की केएल राहुल मागचा हिशेब चुकता करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. केएल राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. चांगली विकेट दिसते, आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली, चांगला बचाव केला. त्यांचा आमच्याविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे, त्यांचा संघ चांगला आहे. आमच्याकडे काही चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे मॉर्न आणि इतर आहेत.”
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती, खूप आनंद झाला. आम्ही सामन्याच्या 33 षटकांसाठी खेळात अव्वल होतो, शेवटची 7 षटके आमच्या बाजूने गेली नाहीत. आमच्याकडे काही बदल आहेत. साहा बाहेर पडला. स्पेन्सर परत आला आहे. मागील सामन्यात काय घडले ते आम्हाला विसरले पाहिजे.”
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव