LSG vs RR : संजू सॅमसन-ध्रुव जुरेलचा अर्धशतकी तडाखा, राजस्थानचा लखनऊवर 7 विकेट्स धमाकेदार विजय
Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Highlights In Marathi : राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या या 17 व्या मोसमात लखनऊ सुपर जायंट्सवर दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनऊने विजयासाठी दिलेलं 197 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानचा हा या मोसमातील आठवा तर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय ठरला. कॅप्टन संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल ही जोडी राजस्थानच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी राजस्थानसाठी चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. तसेच या दरम्यान दोघांनी अर्धशतक ठोकलं.
जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने 197 या विजयी धावांचा पाठलाग करताना राजस्थानला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर लखनऊने राजस्थानला झटपट 3 धक्के देत सामन्यात कमबॅक केलं. त्यामुळे लखनऊने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. मात्र त्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
बटलर आणि यशस्वी या दोघांनी 60 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल 34 आणि 24 धावा करुन बाद झाले. त्यानंतर रियान पराग 14 धावांवर आऊट झाला. त्यामुळे राजस्थानची स्थिती 3 बाद 78 अशी झाली. त्यानंतर जुरेल आणि संजू राजस्थानला विजयी करुनच थांबले. राजस्थानने 6 बॉल राखून 199 धावा केल्या. संजूने नाबाद 71 धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेल 52 रन्सवर नॉट आऊट राहिला. लखनऊकडून यश ठाकुर, मार्क्स स्टोयनिस आणि अमित मिश्रा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
लखनऊची बॅटिंग
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून चेसिंगचा निर्णय घेतला. लखनऊने राजस्थानसमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं. लखनऊे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर दीपक हुड्डाने त्याला चांगली साथ दिली. दीपकने 31 चेंडूत 50 धावा केल्या. आयुष बदोनी याने 18* धावा जोडल्या. कृणाल पंड्या याने 11 बॉलमध्ये नॉट आऊट 15 रन्स केल्या. निकोलस पूरन याने 11 धावांचं योगदान दिलं. क्विंटन डी कॉक 8 धावा करुन माघारी परतला. तर मार्क्स स्टोयनिस याला भोपळाही फोडता आला नाही. तर राजस्थानकडून संदीप शर्मा याने 2 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्ट , आवेश खान आणि आर अश्विन या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर.