RCB vs LSG : लखनऊ संघाचा आरसीबीवर सुपर विजय, घरच्या मैदानावर बंगळुरूचा दुसरा पराभव

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आरसीबी संघाचा घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव झाला आहे. विराट कोहली लवकर आऊट झाल्यावर परत एकदा आरसीबी उघडी पडलेली दिसली. खोऱ्याने धावा निघणाऱ्या बंगळुरूच्या स्टेडियमवर एकाही खेळाडूला मॅचविनिंग खेळी करता आली नाही. आरसीबीचा तिसरा पराभव तर लखनऊने सलग दुसरा सामना जिंकला आहे.

RCB vs LSG : लखनऊ संघाचा आरसीबीवर सुपर विजय, घरच्या मैदानावर बंगळुरूचा दुसरा पराभव
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 11:33 PM

आयपीएलमधील 15 व्या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने घरच्या मैदानावर आरसीबीचा 28 धावांनी पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनऊने आरसीबीला घरच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केलं. लखनऊने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 153-10 धावा केल्या. माहिपाल लोमरोर याने सर्वाधिक 33 धावा तर रजत पाटीदार याने 29 धावा केल्या. टॉप ऑर्डरची पडझड झाल्यावर आरसीबीच्या इतर कोणत्याही खेळाडूने डाव सावरला नाही. अखेर या सीझनमधील आरसीबीचा तिसरा पराभव तर लखनऊ संघाने हा सलग दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात मयंक यादव याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून निवड झाली आहे.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 200 च्या आतमधील धावसंख्येचा पाठलाग करणं फार काही कठीण जात नाही. त्यामुळे आरसीबी घरच्या मैदानावर सहज विजय मिळवणार असं बोललं जात होतं. मात्र लखनऊने आरसीबीला घरच्या मैदानावर 28 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांना रोखण्यासाठी राहुलने  खाल चाल खेळली. पहिलीच ओव्हर स्पिनरला दिली, तमिळनाडूचा सिद्धार्थ दोघांवर चांगलाच भारी पडला. अखेर त्याने विराट कोहलीला 22 धावांवर  माघारी पाठवलं.

विराट आऊट झाल्यावर रजत पाटीदार याने 29 धावा आणि माहिपाल लोमरोर याने 33 धावा केल्या. दोघांना सोडून इतर कोणत्याही खेळाडूला मैदानावर धावा काढत्या आल्या नाहीत. आजच्या सामन्यात लखनऊचा खेळाडू राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मयंक यादव याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पठ्ठ्याने या सामन्यातही सर्वांची मने जिंकलीत. आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 13 धावा देत 3 विकेट घेतल्या, एकूण 17 बॉल त्याने निर्धाव टाकले. लखनऊ संघासाठी जमेची बाजू झाली असून या विजयासह लखनऊ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेवन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.