राजकारणाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौतम गंभीर आपल्या कामाप्रती आक्रमक, थेट इशारा देत म्हणाला…
लोकसभा निवडणुकीपूर्वीच गौतम गंभीरने सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला आहे. खासदारकी लढवणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. तसेच पुढील कामावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगत राजकारणाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता गंभीरने आपल्या कामाला सुरुवात केली असून पहिलीच आक्रमक प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्लीतून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आला होता. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याने राजकारणाला रामराम ठोकला आहे. आता तो क्रिकेटमधील नवीन कामगिरीकडे लक्ष ठेऊन आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून त्याची नियुक्ती करण्अयात आली आहे. तसेच स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये त्याने भाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. आता केकेआरला स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता स्टार स्पोर्टशी बोलताना गंभीरने सांगितलं की, आयपीएल माझ्यासाठी एक सीरियस क्रिकेट आहे. मी हे खूप गांभीर्याने घेतो.
गौतम गंभीरने सांगितलं की, ‘सुरुवातीलाच मी हे स्पष्ट केलं आहे की, माझ्यासाठी आयपीएल एक सीरियस क्रिकेट स्पर्धा आहे. बॉलिवूड, वैयक्तिक अजेंडा किंवा सामन्यानंतर होणाऱ्या पार्ट्यांबाबत नाही.हे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याबद्दल आहे. म्हणून जगातील सर्वात कठीण लीग आहे. तसेच क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ आहे. ही क्रिकेट लीग अन्य क्रिकेट लीगपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जव आहे. जर फेमस फ्रेंचायसी बनायचं असेल तर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.’, असं गौतम गंभीरने सांगितलं.
Trust @GautamGambhir to deliver on-point answers! ✔💪🏻
He believes the brand of cricket played in the #IPL is on a level comparable with international cricket!
Will his experience help #KKR win the upcoming #IPLOnStar season?
Be sure to watch IPL on Star Sports from MARCH 22 pic.twitter.com/gdYf7hXHvv
— Star Sports (@StarSportsIndia) March 3, 2024
“कोलकात्याचे फॅन सर्वात जास्त भावुक आहेत. प्रामाणिक राहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आयपीएलच्या पहिल्या तीन वर्षांत कोलकात्याच्या चाहत्यांनी खूप सहन केले आहे आणि ते आमच्या समर्पणाला पात्र आहेत.”, असंही गौतम गंभीरने पुढे सांगितलं.
कोलकात्याचा संपूर्ण संघ
नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कर्णधार), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवरी, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमिरा, साकिब हुसेन.