MI vs GT | पंड्या इतका माज बरा नाही, पहिल्याच मॅचमध्ये रोहितसोबत गैरवर्तन, पाहा Video
Hardik Rude With Rohit : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यात निवनियुक्त कॅप्टन हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत चुकीचं वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहितसोबत पंड्याने नेमकं काय केलं जाणून घ्या.
अहमदाबाद | आयपीएल 2024 मध्ये क्रिकेट चाहते मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्त्व करताना तर रोहित शर्मा खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यावर चाहते भावनिक झाले होते. मात्र काही वेळानंतर रोहित आणि हार्दिक एकत्र दिसल्यावर चाहत्यांनी दोघांच्या नावाचा जल्लोष केला. मात्र पंड्याने मैदानात असं काही केलं की ज्यामुळे नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.
नेमकं काय घडलं?
हार्दिक पंड्या याने सामन्याला सुरूवात झाल्यावर कॅप्टन रोहित शर्मा याची एक दोन नाहीतर चार वेळा जागा बदलल्याचं पाहायला मिळालं. कॅप्टन असल्याने त्याने फिल्डिंगची जागा बदलली तर काही हरकत नाही पण त्याने ज्या पद्धतीने जागा बदलली ते चाहत्यांना काही पटलं नाही. पंड्या रोहितवर ओरडल्यासारखा बोलत होता, महत्त्वाचं म्हणजे रोहितलही खरं वाटलं नाही तो त्याला सीमारेषेवर पाठवत आहेत.
रोहित त्याला विचारत होता की मला पाठवत आहेस का? त्यानंतर रोहितलाही समजलं त्यालाच तो पाठवत आहे. रोहित काहीही बोलला नाही थेट गेला आणि एक कॅचही त्यानेस पकडला. मात्र पंड्याच्या अशा वागण्याने चाहते त्याच्यावर भडकले आहेत. सोशल मीडियावर रोहितच्या बाजुने चाहते बोलत असून पंड्या घमंडी, स्वार्थी असल्याचं म्हणत नेटकरी त्याला धारेवर पकडत आहेत.
पाहा व्हिडीओ:-
Hardik Pandya's behaviour as captain! pic.twitter.com/nI4OyDTJTp
— Swanand Bikkad (@SwanandAsks) March 25, 2024
दुसरं म्हणजे पंड्याने आजच्याही सामन्यात पहिली ओव्हर टाकली. संघात एक से बढकर एक बॉलर असताना त्याने पहिली ओव्हर टाकल्याने त्याच्यावर टीका होत आहे. पंड्या गुजरातचा कॅप्टन असतानाही पहिली ओव्हर टाकायचा, टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कॅप्टन होता तेव्हाही त्याने पहिली ओव्हर टाकली होती. आजच्या सामन्यात पहिली ओव्हर घेतल्याने त्याच्यावर टीका होत आहे. पंड्याने आपल्या स्पेलमध्ये तीन ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता तीस धावा दिल्या.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड