IPL 2024 | 17 व्या मोसमाआधी हिटमॅन नव्या भूमिकेत, व्हीडिओ व्हायरल
IPL 2024 MI Rohit Sharma Video | आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता मोजून अवघे काही तास बाकी आहेत. क्रिकेट चाहत्यांमध्ये तिकीटासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंडया याला कॅप्टन केला. रोहितला कॅप्टन म्हणून हटवल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. त्यानंतर आता 17 व्या हंगामाची लगबग सुरु झाली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमाला आता 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी हिटमॅन रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या गोटात जोडला गेला आहे. रोहित टीममध्ये नव्या भूमिकेत दिसून आला. रोहितचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माने 19 मार्च रोजी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. रोहित या फोटोंमध्ये सराव करताना दिसतोय. रोहितने 2013 साली मुंबई इंडियन्सची सूत्रं हाती घेतली होती. तेव्हापासून त्याने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र आता हार्दिक पंड्या याला कॅप्टन केलंय. त्यामुळे आता रोहित हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
रोहितचा व्हीडिओ व्हायरल
माजी कर्णधार रोहित शर्मा याचा बॅटिंगचा व्हीडिओ मुंबई इंडिन्सने सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे. रोहित या व्हीडिओमध्ये तोडफोड बॅटिंग करताना दिसतोय. आता रोहितकडे कॅप्टन्सीची जबाबदारी नाही. त्यामुळे तो जबाबदारीतून मुक्त झालाय. त्यामुळे रोहितकडून यंदा नेहमीपेक्षा आक्रमक आणि तोडफोड बॅटिंग पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे रोहित नेहमीपेक्षा यंदा नव्या भूमिकेत दिसू शकतो.
हार्दिक रोहितबाबत काय म्हणाला?
सोमवारी 19 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला कॅप्टन हार्दिक पंड्या आणि कोच मार्क बाऊचर उपस्थित होते. या दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तुला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर रोहितसोबत बोलणं झालं का? असा प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला. “अद्याप याबाबत काहीच बोलणं झालेलं नाही. रोहित सध्या बिझी आहे”, असं उत्तर हार्दिकने दिलं. तसेच “रोहित टीम इंडियाचा कॅप्टन आहे. तो नेहमीच मदत करतो. जेव्हा पण मदतीची गरज असेल, तेव्हा त्याचा हात माझ्या खांद्यावर असेल”, असं हार्दिक म्हणाला.
रोहितचा जोरदार सराव
🙂 ➡️ 😊 ➡️ 😃 ➡️ 😁#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/PtPtYBGsfc
— Mumbai Indians (@mipaltan) March 19, 2024
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमनधीर सिंह, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक शर्मा.