IPL 2024 MI : रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, सरळ स्पष्टच सांगितलं की…

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक असताना मुंबई इंडियन्समधील वाद चव्हाट्यावर आहे. फ्रेंचायसीमध्ये काहीतरी घडामोडी घडत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या आहे. क्रिप्टिक पोस्टमुळे सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. असं असताना रितिका सजदेह थेट कमेंट केली होती. आता रोहित शर्माची प्रतिक्रिया आली आहे.

IPL 2024 MI : रितिकाच्या 'त्या' कमेंट्सनंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, सरळ स्पष्टच सांगितलं की...
मुंबई इंडियन्समध्ये नेमकं चाललंय तरी काय? रितिकाच्या त्या कमेंट्सनंतर रोहित शर्मा अशा पद्धतीने झाला रिअॅक्ट
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 8:24 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. ट्रेड विंडो आणि मिनी ऑक्शनच्या माध्यमातून दहा संघ सज्ज झाले आहेत. ट्रेड विंडोत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या संघात घेतलं. इतकंच काय तर रोहित शर्माकडील कर्णधारपद त्याच्याकडे सोपवलं. व्यवस्थापनाच्या या निर्णयाने फॅन्सनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाउचर या घडामोडीवर स्पष्टीकरण दिलं होतं. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण त्या मुलाखतीवर रितिका सजदेहने प्रतिक्रिया देताच वादळ उठलं. तिने या व्हिडीओखाली कमेंट करत चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्नी रितिकाचा फोटो शेअर करत एक कमेंट लिहिली आहे. त्या प्रतिक्रियेचा संदर्भ रितिकाच्या कमेंट्सशी जोडला जात आहे.

रोहित शर्माने काय पोस्ट केलं आहे?

रोहित शर्माने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्यासाठी कायम उभी राहणारी रितिका.’ या कमेंट्सचा थेट संबंध फॅन्स रितिकाने बाउचरला केलेल्या कमेंट्सशी जोडत आहेत. फॅन्सच्या मते, रोहित शर्माने रितिकाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. रोहित आणि रितिका फोटोत एका हॉटेलमध्ये एकत्र जाताना दिसत आहेत.

दुसरीकडे, रोहित शर्मा यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयपीएल 2024 स्पर्धेत रोहित शर्मा नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. कारण आयपीएल ट्रेड विंडो अजूनही सुरू आहे. याचा अर्थ खेळाडूंची आदलाबदल करण्याची अजूनही संधी आहे. पण इथे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला आपला निर्णय घ्यावा लागेल.

आयपीएल खेळाडूंच्या देवाणघेवाण नियमांनुसार, लिलावानंतर ट्रेड विंडो उघडली जाईल. आयपीएल सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी खेळाडूंची विक्री किंवा हस्तांतरण करता येते. या पर्यायातून रोहित शर्मा दुसऱ्या संघात जाऊ शकतो. आयपीएल 22 मार्चपासून सुरू होत असेल, तर ट्रेड विंडो 22 फेब्रुवारीला बंद होईल. यानंतर, खेळाडूंचे हस्तांतरण किंवा विक्री करता येणार नाही. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत ट्रेड झाली तरच हिटमॅन दुसऱ्या संघासाठी खेळू शकेल.

ट्रेड विंडोचा पर्याय फक्त फ्रँचायझीसाठी आहे. म्हणजेच रोहित शर्मा स्वतः या पर्यायाचा लाभ घेऊ शकत नाही. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माला ट्रान्सफर किंवा विकले पाहिजे. अन्यथा, रोहित शर्माला खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळावे लागेल. त्यामुळेच आता येत्या दोन आठवड्यांत मुंबई इंडियन्स काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.