IPL 2024 | रोहित शर्मा महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज, ठरणार पहिलाच भारतीय
Sharma Mumbai Indians | रोहित शर्मा याने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता रोहित अशाच एका महारेकॉर्डच्या उंबरठ्यावर आहे.
मुंबई | क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा काही तासांमध्येच संपणार आहे. आयपीएल 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणर आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स या मोसमातील पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध 24 मार्च रोजी खेळणार आहे. या हंगामाआधी फ्रँचायजीने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्या याला नेतृत्व दिलं.
रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने तो आता आणखी बेछूट बॅटिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहितला या आयपीएलमध्ये पहिला भारतीय म्हणून महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये 500 सिक्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 13 सिक्सची गरज आहे. रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा पहिला भारतीय आहे. रोहितने आतापर्यंत 426 टी20 सामन्यांमध्ये 487 सिक्स लगावले आहेत. आता आयपीएल 17 व्या हंगामात 13 सिक्स लगावताच हिटमॅन 500 सिक्स पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरेल. आतापर्यंत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांनाही असा कारनामा करता आलेला नाही.
टी 20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सिक्स
सुरेश रैना – 325 महेंद्रसिंह धोनी -325 विराट कोहली – 371 रोहित शर्मा – 487
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स
रोहित शर्मा – 487 सिक्स एलेक्स हेल्स – 494 सिक्स कॉलिन मुनरो – 548 सिक्स आंद्रे रसेल – 668 सिक्स किरॉन पोलार्ड – 860 सिक्स ख्रिस गेल – 1056 सिक्स
हिटमॅन रोहित शर्मा
Ro batting 🤝 Watching him bat
Ultimate सुख 💙#OneFamily #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/GhEXh7X7X7
— Mumbai Indians (@mipaltan) March 19, 2024
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका , नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, रोमारियो शेफर्ड आणि नमन धीर.