IPL 2024, MI vs CSK : चेन्नईची मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठी खेळी, वानखेडेवर वापरलं ‘मराठी कार्ड’
आयपीएल 2024 स्पर्धेत हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र चेन्नई सुपर किंग्सने आपला पत्ता बाहेर काढला आणि प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात ओढलं.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघानी आयपीएलचे पाच जेतेपद जिंकली आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमचा फॅनबेस काही वेगळा आहे. सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असल्याने मुंबईला प्रेक्षकांची साथ मिळणार याची जाणीव होती. त्यामुळे नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा होता. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे दुसऱ्या डावात दव फॅक्टर पाहून चेन्नई सुपर किंग्सने मोठी खेळी केली. चेन्नई सुपर किंग्समध्ये पाच महाराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यात चार जणांना वानखेडेची खेळपट्टी बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने लोकल बॉल अजिंक्य रहाणेला ओपनिंगला संधी दिली. मागच्या आयपीएल स्पर्धेत अजिंक्य रहाणेनं मुंबईची पिसं काढली होती. मात्र यंदा त्याला तसं करता आलं नाही. असं असलं तरी चेन्नई सुपर किंग्सच्या खेळीची चर्चा रंगली आहे.
अजिंक्य रहाणने ओपनिंगला उतरला. इतकंच काय तर त्याने स्ट्राईक घेतली. अजिंक्य रहाणेनं 8 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्या. मात्र गेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि हार्दिक पांड्याच्या हाती झेल देऊन बाद झाला. चेन्नई सुपर किंग्सने केलेली खेळी उत्तम होती. पण आज अजिंक्य रहाणेचा पत्ता काही चालला नाही. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा मराठमोळा कर्णधार ऋतुराज गायकडवाड उतरला आहे. वानखेडेचं मैदान लहान असल्याने धावांचा वर्षाव होईल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे.
नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “आम्हीही आधी गोलंदाजी केली असती, पण नाणेफेकीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. तिन्ही विभागात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. हे आयपीएलचे सौंदर्य आहे. नेहमी चढ-उतार होत असतात. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चांगले खेळणारा संघ जिंकेल. संघात पाथीराणाला घेतलं असून थीक्षानाला आराम दिला आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.