MI vs CSK : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
Mumbai Indians vs Chennai Super Kings Toss Updates : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडिन्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला पहिले बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
वानखेडे स्टेडियमवर टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. वानखेडेत टॉस जिंकणारी टीम 80 टक्के सामना तिथेच जिंकते, असं म्हटलं जातं. त्यामुळे मुंबईने टॉस नाही, सामना जिंकलाय अशी चर्चा आहे. कॅप्टन हार्दिक पंडया याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हमध्ये कोणताही बदल न करता आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर चेन्नईने एकमेव बदल केला आहे. चेन्नईमध्ये मथीशा पथीराणा याची एन्ट्री झाली आहे. पथीराणा याला महीश तीक्षणा याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे.
मुंबई चेन्नईवर वरचढ
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 36 सामन्यात भिडले आहेत. त्यापैकी 20 सामने मुंबईने जिंकले आहेत. तर चेन्नईने 16 सामने जिंकले आहेत. तसेच वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघात झालेल्या एकूण 11 पैकी 7 सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात केली आहे. तर चेन्नई मुंबईला घरच्या मैदानात 4 वेळा चितपट करण्यात यशस्वी ठरलेली आहे. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून मुंबईला वानखेडेत विजयी पंच देणार की पलटण 8 वा विजय मिळवणार, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पलटण टॉसचा बॉस
💙 🤜🤛 💛
How excited are you for the buzzing contest ? 🤔
Follow the Match ▶ https://t.co/2wfiVhdNSY#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/BVSgfuyyFt
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.