Mi vs DC : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने काय चुकलं ते सांगितलं, झालं ते सर्व बोलून गेला
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 43 व्या सामन्यात मुंबई इंडिन्सला दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील सहावा पराभव आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या मनातलं सांगितलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सहाव्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण नऊ सामने खेळले. त्यापैकी 3 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभव झाला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफची वाट आणखी किचकट झाली आहे. मुंबई इंडियन्सला उर्वरित पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल गमवाला असला तरी सामन्यावरची पकड काही सोडली नाही. पहिल्या चेंडूपासून फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबई इंडियन्स संघ 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा करू शकला आणि 10 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातलं सर्वकाही सांगितलं.
“हा खेळ आता खूपच अतितटीचा होताना दिसत आहे. आधी धावांमधलं अंतर षटकांचं असायचं. आता ते चेंडूंवर आलं आहे. अशा प्रकारच्या खेळामुळे बॉलर्सवर दबाव वाढतो. पण आम्ही तसं होत असतानाही पाठबळ देतो. जर मला काही बाहेर काढायचं झालं तर मधल्या षटकांमध्ये आम्ही दोन संधी घेऊ शकलो असतो. डावखुरे खेळाडू कदाचित अक्षरमुळे मागे गेले असावेत. आम्ही ही संधी गमावली असंच म्हणावं लागेल. फ्रेझरने खरंच चांगली फलंदाजी केली. त्याने मोक्याच्या क्षणी संधी साधली आणि न डगमगता फटकेबाजी केली.”, असं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला. नाणेफेकीचा निकालवेळी वेगळं काही करण्याची गरज नव्हती, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.