IPL 2024, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी नमवलं, मोक्याच्या वेळी पराभूत करत काढला वचपा

आयपीएल 2024 स्पर्धेत 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत केलं आहे. दिल्लीने विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबई इंडियन्स संघ फक्त 247 धावा करू शकला.

IPL 2024, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी नमवलं, मोक्याच्या वेळी पराभूत करत काढला वचपा
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 7:44 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. यासह प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. तर मुंबई इंडियन्सची पुढची वाटचाल बिकट झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा करू शकला. मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑपचं गणित खूपच किचकट झालं आहे. आता उर्वरित पाच सामन्यात मुंबई इंडियन्सला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे प्लेऑफची लढाई खूपच अतितटीची होणार यात शंका नाही. पुढे प्लेऑफमध्ये कोणते चार संघ एन्ट्री घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबई इंडियन्सचा डाव

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 258 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक राहिली. कारण पॉवर प्लेमध्ये 65 धावा आल्या तरी 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. इशान किशन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. इशान किशन 14 चेंडूत 20 धावा, रोहित शर्मा 8 चेंडूत 8 धावा, तर सूर्यकुमार यादव 13 चेंडूत 26 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे धावा आणि चेंडू यांच्यातलं अंतर वाढत होतं. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने चौथ्या गड्यासाठी 25 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. कर्णधार हार्दिक पांड्या 24 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.  नेहल वढेराही काही खास करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सकडून जेक फ्रेझर मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल जोडीने आक्रमक सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये या जोडीने बिनबाद 92 धावांची खेळी केली. जेक फ्रेझर मॅकगुर्कने 27 चेंडूत 84 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. तर अभिषेक पोरेलने 27 चेंडूत 36 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली. शाई होपनेही आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. 17 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. पंतनेही 19 चेंडूत 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 48, तर अक्षर पटेलने नाबाद 11 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.