MI vs DC : जेक फ्रेझर मॅकगुर्कने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीबाबत केलं मोठं वक्तव्य, “मी बुमराहचे फूटेज…”

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी जिंकला. या सामन्यातील विजयानंतर जेक फ्रेझर मॅकगुर्कला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यावेळी त्याने आपल्या आक्रमक खेळीचं गुपित उघड केलं.

MI vs DC : जेक फ्रेझर मॅकगुर्कने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीबाबत केलं मोठं वक्तव्य, मी बुमराहचे फूटेज...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 10:18 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगतदार सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी जिंकला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत दिल्लीच्या जेक फ्रेझर मॅकगुर्क याची मोलाची साथ लाभली. त्याने पहिल्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत आपलं ध्येय स्पष्ट केलं. तसेच त्या षटकात 19 धावा काढल्या. जेकने 27 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. यामुळे मुंबईचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. फ्रेझर-मॅकुगर्क याला कुठे चेंडू टाकायचं तेच कळत नव्हतं. त्याने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. कारण त्याने बाद होण्याची एकही संधी दिली नाही. पण पियुष चावलाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना सीमेजवळ मोहम्मद नबीने झेल घेतला. फ्रेझरचा डाव 84 धावांवर आटोपला. या खेळीसाठी त्याला सामन्यानंतर सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

जेक फ्रेझर मॅकगुर्क म्हणाला की, “मला सुरुवातीला थोड नर्वस वाटत होतं. मी बुमराहच्या फुटेज पूर्ण दिवस बघितले होते. पण आपण जसा विचार करतो त्याचा विरोधाभास आपल्याला सामन्यात पाहायला मिळतो. तुम्हाला फक्त चेंडूवर लक्ष केंद्रीत करायचं असतं. एका जगातील चांगल्या गोलंदाजासमोर तुमची खऱ्या अर्थाने कसोटी असते. यावेळी तुमची धडधड होत असते. माझी ही खेळी माझ्यासाठी आणि संघासाठी आत्मविश्वास वाढवणारी आहे. बाहेर बसून या स्पर्धेबाबत तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. इतर लीगच्या तुलनेत ही खरंच खूप मोठी लीग आहे. या लीगचा मी भाग आहे खरंच आनंदाची बाब आहे.”

दिल्ली कॅपिटल्सला आणखी 4 सामने खेळायचे आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे एकूण 10 गुण आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सला 18 गुण करण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सने उर्वरित चार पैकी 3 सामन्यात विजय मिळवला तरी प्लेऑफचं गणित सुटेल. आता दिल्ली कॅपिटल्स पुढे कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.