IPL 2024, MI vs LSG : मुंबई इंडियन्ससाठी ‘अर्जुन’ उतरला मैदानात, 2025 मेगा लिलावापूर्वी लागला कस
आयपीएल 2024 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत सुरु आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्जुनच्या या सामन्यात कस लागला आहे. अष्टपैलू भूमिका कशा पद्धतीने बजावतो? याकडे लक्ष लागून आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 67वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर नेट रनरेटचं गणित पाहिलं तर लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळवून तसा काही फायदा होणार नाही. त्यामुळे दोन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत संधी न मिळालेल्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. मुंबई इंडियन्सने संघात ज्युनिअर तेंडुलकरला संधी दिली आहे. अर्जुन तेंडुलकरला जसप्रीत बुमराहच्या जागी संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं तरी पुढच्या येणाऱ्या मेगा लिलावाचे वेध लागून आहे. कारण रिलीज आणि रिटेन खेळाडूंबाबत उत्सुकता आहे. कारण दोन खेळाडूंना रिटेन ठेवण्याची परवानगी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना रिलीज केलं जाईल आणि त्यांचा मेगा लिलावात सहभाग असेल. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी कशी आहे यावरून त्यांची किंमत ठरणार आहे.
अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्स 20 लाखांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं होतं. आता अर्जुन तेंडुलकरची 30 लाख ही किंमत आता आहे. त्यामुळे पुढच्या लिलावात त्याच्यासाठी कोणता संघ किती पैसे मोजतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, या पर्वात अर्जुन तेंडुलकरने चार षटकं टाकली. पॉवर प्लेमध्ये टाकलेल्या दोन षटकात फक्त 10 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरने पहिल्या षटकात 3 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकता अर्जुन तेंडुलकरने 7 धावा दिल्या.
संघाचं 15 वं षटक टाकण्यासाठी अर्जुन तेंडुलकर आला. यावेळी त्याने टाकलेल्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार आले. या दरम्यान त्याला दुखापत झाल्याने नमन धीरने उर्वरित चार चेंडू टाकले. अर्जुन तेंडुलकर बाहेर गेला आणि रोहित शर्मा मैदानात उतरला. अर्जुन तेंडुलकरने 2.2 षटकं टाकतं 22 धावा दिल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.