IPL 2024, MI vs LSG : वानखेडेवर अर्जुन तेंडुलकरची मार्कस स्टोयनिसला ‘खुन्नस’, पाहा व्हिडीओ काय केलं ते
आयपीएल 2024 स्पर्धेतील 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पूत्र असल्याने त्याच्याभोवती एक वेगळंच वलय आहे. असं असलं तरी अर्जुनला हवी तशी संधी मिळालेली नाही. शेवटच्या सामन्यात अर्जुनने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली.
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्लेइंग इलेव्हनबाबत सांगितलं. यात अर्जुन तेंडुलकरचं नाव असल्याने क्रीडाप्रेमींना त्याची कामगिरी पाहण्याची उत्सुकता वाढली. मागच्या पर्वात त्याला चार सामन्यात संधी मिळाली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला होता. आता या पर्वातील 13 सामने झाल्यानंतर शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. 13 सामन्यांची प्रतीक्षा केल्यानंतर हार्दिक पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुनल तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या दोन षटकात त्याने चांगली गोलंदाजी केली. दोन षटकात फक्त 10 धावा दिल्या. यावेळी त्याने लखनौचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोयनिसला राग दिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्णधार हार्दिक पांड्याने अर्जुन तेंडुलकरकडे संघाचं दुसरं षटक सोपवलं. पहिलाच चेंडू त्याने 130.6 किमी प्रतितास वेगाने टाकला. यावर धाव घेता आली नाही. अर्जुन तेंडुलकरने टाकलेला दुसरा चेंडू स्टोयनिसच्या पायावर आदळला. यावेळी पंचांनी त्याला बाद घोषित केलं. मात्र रिव्ह्यूत बाद नसल्याचं समरो आलं. तिसऱ्या चेंडू पुन्हा निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवरही धाव घेता आली नाही. पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि सहावा चेंडू वाइट टाकला. त्यानंतर सहावा चेंडू परत टाकावा लागला आणि निर्धाव गेला. या षटकाच्या शेवटच्या अर्जुन तेंडुलकरचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. फॉलो थ्रूमध्ये चेंडू हाती आल्यानंतर त्याने स्टोयनिसच्या दिशेने रागाने फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला राग दाखवला.
How much fine for Arjun Tendulkar? pic.twitter.com/Yc1sa6oZp7
— Satyam (@iamsatypandey) May 17, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.