MI vs LSG : मुंबईने लखनऊ विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनध्ये अर्जुनची एन्ट्री
Mumbai Indians vs Lucknow Super Giants Toss : मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी बदल केले आहेत.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांचा हा या हंगामातील अखेरचा सामना आहे. मुंबई इंडियन्स आपला या मोसमातील अखेरचा सामना हा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. हार्दिक पंड्या याच्याकडे पलटणचं नेतृत्व आहे. तर केएल राहुल लखनऊची कॅप्टन्सी करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस पार पडला. मुंबईने टॉस जिंकला. कॅप्टन हार्दिकने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
मुंबई की लखनऊ, आकडे कुणाचे सरस?
मुंबईने या हंगामात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला फक्त 4 सामने जिंकण्यात यश आलंय. तर 7 वेळा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे. मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामना झाले आहेत. त्यापैकी लखनऊने 4 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला केवळ 1 सामनाच जिंकण्यात यश आलंय.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या याने मुंबईच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केलेत. अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि रोमरिया शेफर्ड या तिघांना संधी दिलीय. तर जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांना ब्रेक दिला आहे. तर लखनऊने क्विंटन डी कॉकला बाहेर ठेवलं आहे. तर देवदत्त पडीक्कल आणि मॅट हेन्रीची एन्ट्री झालीय.
नाणेफेकीचा कौल पलटणच्या बाजूने
🚨 Toss Update 🚨@mipaltan elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match https://t.co/VuUaiv5dPT#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/iSYDcNmMtT
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.