मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधून DRS चा इशारा, सॅम करन भडकला आणि पंचांना सांगितलं पण…
आयपीएल 2024 स्पर्धेतील 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 9 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 7 गडी गमवून 192 धावा केल्या. मात्र या डावातील डीआरएसचा एक निर्णय वादात अडकला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील पंचांचे काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काही माजी खेळाडूंनीही पंचांच्या कामगिरीवर बोट उचललं आहे. इतकंच काय तर समालोचकही समालोचन करताना आश्चर्य व्यक्त करत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुल्लापूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग मैदानात हा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात थर्ड अम्पायरच्या काही निर्णयावरून वादाला फोडणी मिळाली आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच मुंबई इंडियन्स फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात एका निर्णयावरून वाद झाला.
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने एक वाइड यॉर्कर चेंडू टाकला होता. सूर्यकुमार यादव लेग स्टंपजवळ उभा होता. त्यामुळे त्याला हा चेंडू खेळता आला नाही. पंचानी हा वाइड दिला नाही. पण डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडू आणि स्टाफने रिव्ह्यू घेण्याच इशारा करत होते. यात मार्क बाउचर, कायरन पोलार्ड आणि टिम डेविड होता. त्यांचा हा इशारा पाहून पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन चांगलाच संतापला. याबाबतचे व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Here's another DRS incident to note during the MI inning.
1. Arshdeep bowled a ball to Surya.2. Umpire didn't react.3. MI head coach gestured to batters that it's wide.4. Batters avoided, but he made another gesture.5. Sam was angry.6. Sam complained to the umpire.7 pic.twitter.com/olj3VWvibm
— jatin Bishnoi (@jatinbishnoi290) April 19, 2024
कर्णधार सॅम करनने मैदानातील पंचाकडे जाऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही. मैदानी पंचांनी थर्ड अम्पायरकडे रिव्ह्यूसाठी इशारा केला. रिप्लेत थर्ड अम्पायरने चेंडू वाइड असल्याचं घोषित केलं. सॅम करन 19वं षटक टाकत असतानाही असंच झालं होतं. टिम डेविडने बॉल मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटच्या खालून गेला आणि थेट विकेटकीपरच्या हाती गेला. अंपायरने हा वाइड दिला नाही. पण खेळाडूने रिव्ह्यू घेतला. बॉल बॅटच्या खालून जात असतानाही थर्ड अम्पायर नितीन मेननने वाइड दिला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.