MI vs SRH : हैदराबादकडून मुंबईला 174 धावांचं आव्हान, कॅप्टन पॅटची निर्णायक खेळी, पंड्या-पियूषला 3 विकेट्स
MI vs SRH 1st Innings Highlights In Marathi : मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात हैदराबादकडून 174 धावांचं आव्हान मिळालं आहे.
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. मुंबईने हैदराबादला ठराविक अंतराने हैदारबादला झटके देत बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र अखेरच्या क्षणी कॅप्टन पॅट कमिन्स याने नाबाज 35 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला 150 पार मजल मारता आली. तर मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. हैदराबादसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकते की मुंबई गेल्या पराभवाचा वचपा घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
हैदराबादची बॅटिंग
हैदराबादकडून ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटाकारच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा याने 11 धावांचं योगदान दिलं. मयंक अग्रवाल 5 रन करुन आऊट झाला. नितीश रेड्डी 20 धावांवर माघारी परतला. पीयूष चावला याने हेन्रिक क्लासेन याला 2 धावावर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जान्सेन 17 रन्स करुन बाहेर गेला.
शहबाज अहमद याने 10 धावा जोडल्या. अब्दुल समदने 3 रन्स केल्या. तर टीम अडचणीत असताना पॅट कमिन्सने सनवीर सिंह याच्यासह निर्णायक धावा जोडल्या. पॅटने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 35 धावा केल्या. तर सनवीर सिंहने 8 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून हार्दिक-पीयूष व्यतिरिक्त अंशुल कंबोज आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
मुंबईला 174 धावांचं आव्हान
A job well done with the ball, now ready to do it with the bat! 👊
Let’s go, Mumbai 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvSRH pic.twitter.com/0qmThhYFMc
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.