MI vs SRH : सूर्यकुमार यादवचं घरच्या मैदानात विस्फोटक अर्धशतक, मुंबई जिंकणार?
Suryakumar Yadav Fifty MI vs SRH : सूर्यकुमार यादवने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईसाठी निर्णायक क्षणी अर्धशतक ठोकलंय.
लोकल बॉय सूर्यकुमार यादव याने मुंबई इंडियन्ससाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये निर्णायक क्षणी विस्फोटक अर्धशतक ठोकलंय. सूर्यकुमारने मुंबई अडचणीत असताना टीमचा डाव सावरला. सूर्याने संधी मिळाली तशी फटके मारले. सूर्याने मैदानात चौफेर फटके मारले. सूर्याने या अर्धशतकाआधी तिलक वर्मा याच्यासोबत मुंबईला सावरलं. सूर्या आणि तिलक या दोघांनी भागीदारी करत मुंबईला सामन्यात कायम ठेवलं. सूर्याने यासह वैयक्तिक अर्धशतकही झळकावलं. सूर्यकुमार यादवने अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने 5 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 166.67 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. सूर्याचं हे आयपीएल कारकीर्दीतील 25 वं अर्धशतक ठरलं.
पलटणच्या घसरगुंडी शतकी भागीदारी
मुंबईची 174 धावांचा पाठलाग करताना खास सुरुवात राहिली नाही. मुंबईने झटपट 3 विकेट्स गमावल्या. ईशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 वर आऊट झाले. त्यामुळे मुंबईची स्थिती 3 बाद 31 अशी झाली. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्मा याच्यासोबत मुंबईचा डाव सावरला. दोघेही सेट झाले. दोघांनी जम बसवला. त्यानंतर सूर्यासह तिलकनेही टॉप गिअर टाकला. या दोघांनी लूज बॉलवर मोठे फटके मारले आणि पलटणला सामन्यात कायम राखलं.
सूर्यकुमार यादवचा कडक सिक्स
𝗦.𝗞.𝗬 𝗳𝘂𝗹𝗹 𝗼𝗳 𝘀𝗶𝘅𝗲𝘀 ✨
3️⃣5️⃣0️⃣0️⃣ runs & counting for Suryakumar Yadav in #TATAIPL 👏👏
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#MIvSRH | @mipaltan pic.twitter.com/MKqqtlZ8uf
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
3500 धावा पूर्ण
सूर्यकुमार यादवने या अर्धशतकी खेळीदरम्यान खास कीर्तीमान केला. सूर्याने आयपीएल कारकीर्दीतील 3 हजार 500 धावांचा टप्पा पार केला.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.