IPL 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू, लिलावावेळी नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या
IPL 2024 Most Expensive Player | आयपीएलच्या थरालाला कधी एकदा सुरूवात होते याची क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहेत. त्याआधी पार पडलेल्या लिलावात कोणता खेळाडू महाग ठरला होता आणि कोणामध्ये त्यावेळी चुरस लागली होती. सर्वकाही जाणून घ्या.
मुंबई : आयपीएल 2024 थराराला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. येत्या 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात होणार आहे. सगळ्या संघांनी आपली ताकद लावली असलेली दिसून आलं. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिवावामध्ये इतिहासामधील सर्वाधिक बोली लागली. एकच नाही तर दोन मोठ्या बोली लागल्या, महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही बोली ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना लागल्या आहेत.
कोण आहेत ते खेळाडू? किती बोली लागली?
आयपीएलच्या इतिहासातील मिचेल स्टार्क याला 24 कोटी 75 लाख रूपयांची बोली लागली. कोलकाता संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. मिचेल स्टार्क याची 2 कोटी रूपये बेस प्राईज होती, सर्वांचं स्टार्कला किती बोली लागते आणि त्याला कोण खरेदी करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. स्टार्क याला आपल्या संघात घेण्यासाठी गुजरात संघाने आपली सर्व ताकद दिसली.
2 कोटी बेस प्राईज असलेल्या मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाख रूपयांची बोली लागली. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात शेवटपर्यंत स्टार्क याला खरेदी करण्यासाठी संघर्ष पाहायला मिळाला होता. अखेर कोलकाता संघाने बाजी मारली आणि स्टार्कला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. स्टार्क याने शेवटचा आयपीएल सामना 2015 साली खेळला होता. त्यानंतर तो आता आठ वर्षांनी मैदानात दिसणार आहे.
काही वेळातच मोडला रेकॉर्ड
दुसरा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स. सनरायजर्स हैदराबाद संघाने 20 कोटी 50 लाखांची बोली लावत संघात सामील करून घेतलं. स्टार्क आधी कमिन्स याला इतिहासाातील सर्वाधिक बोली लागली होती. मात्र काही वेळातच स्टार्कने त्याचाही विक्रम मोडला.
कमिन्स याची बेस प्राईज 2 कोटी होती. सीएसके आणि मुंबईमध्ये त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र 12 कोटींच्या पुढे कमिन्स याची प्राईज गेल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी उतरले. दोघांपैकी कोणीच मागे हटायला तयार नव्हतं, शेवटी 17 कोटींनंतर तर सीएसकेनेही एन्ट्री मारली होती पण अखेर 20 कोटी 50 लाख रूपयांना सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्य ताफ्यात सामील करून घेतलं.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क हा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचं कर्णधारपद आहे तर पॅट कमिन्स याला हैदराबाद संघाने कर्णधारपद सोपवलं आहे. दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.