IPL 2024 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचं ट्वीट, म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा एक मोठा फॅनबेस आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरल्यानंतर संघाकडून बऱ्याच अपेक्षा चाहत्यांना असतात. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IPL 2024 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचं ट्वीट, म्हणाला...
IPL 2024 : तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आला पुढे, ट्वीट करत सांगितलं की...
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 4:07 PM

आयपीएल स्पर्धेत पहिल्या पर्वानंतर 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत. रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. तिसरा पराभव तर होमग्राउंड असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी आणि 27 चेंडू राखून पराभव केला. इतकंच काय तर या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला हुटिंगही सहन करावी लागत आहे. नाणेफेकीवेळी संजय मांजरेकरने चाहत्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं होतं. तर सामन्यादरम्यान रोहित शर्माही चाहत्यांना इशाऱ्यातून समजवण्याचा प्रयत्न करत होता. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्विटरवर आपलं म्हणणं मांडलं आहे आणि टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

हार्दिक पांड्याने ट्विटरवर लिहिलं आहे की, “एक गोष्ट अशी आहे की, तुम्हाला या टीमबाबत माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे आम्ही कधी हार पत्कारत नाहीत. आम्ही लढत राहू आणि पुढे जात राहू.” मुंबई इंडियन्स संघ फलंदाजी आणि गोलंदाजीतही सुमार ठरत आहे. दोन्ही पातळीवर संघाची पिछेहात होताना दिसत आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत 7 एप्रिलला होणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात उर्वरित 11 सामन्यात मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते याची उत्सुकता आहे. चौथ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र स्पर्धेतील आव्हान आणखी खडतर होत जाईल. जशी स्पर्धा पुढे जाईल तसं इतर संघांवर अवलंबून राहण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे पुढच्या 11 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आणखी मेहनत घ्यावी लागेल. दुसरीकडे, वानखेडे सलग तीन सामने होणार आहेत. त्यामुळे नाणेफेकही महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस

'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.