IPL 2024 | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुनला प्लेइंगमध्ये कॅप्टन पंड्या देणार संधी?
क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आणखी संघर्ष करावा लागणार आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं खरं पण त्याला यंदा टीममध्ये हार्दिक पंड्या संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरचा संघर्ष अजुनही सुरू आहे. सचिन रमेश तेंडुलकरचा वारसा क्रिकेटेमध्येच चालवणं सोप्प नाहीये पण अर्जुन कष्ट घेत आहे. अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत क्रिकेटचे धडे घेत आहे. मात्र आता दिवस जात आहेत आणि त्याचं वयही वाढत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला टीममध्ये जागा मिळते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अर्जुन तेंडुलकर याने मागील हंगामामध्ये म्हणजेच 2023 ला करियरची एक पायरी चढली आहे. अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून डेब्यू केला होता. आयपीएलमध्ये एकाच फ्रंचायसीकडून डेब्यू करणारे पहिले बाप-लेक ठरले. हा परंतु अर्जुन आणि सचिनच्या भूमिकेत बरासचा फरक आहे. अर्जुन ऑल राऊंडर असून तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर याने चार सामने खेळले असून यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. अर्जुनची 1-9 बेस्ट कामगिरी आहे. तर चार सामन्यांमध्ये एका डावात 13 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने एकदा षटकाराचा समावेश आहे.
रोहित शर्मा कर्णधार असताना अर्जुनने 16 एप्रिल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध पदार्पण केलं होतं. या सामन्यामध्ये अर्जुनने दोन ओव्हर टाकल्या होत्या यामध्ये 17 धावा दिलेल्या आणि त्याला एकही विकेट घेता आलेली नव्हती. आयपीएल 2023मधील सर्वात वाईट विक्रम अर्जुन तेंडुलकर याच्या नावावर आहे. पंजाब किंग्ज संघाने अर्जुनच्या एका ओव्हरमध्ये 31 धावा चोपल्या होत्या. यंदा हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीमध्ये त्याला प्लेइंगमध्ये संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू | रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि जेसन बेहरेनडोर्फ.
मुंबईने खरेदी केलेले खेळाडू | गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर.
ट्रेड केलेले खेळाडू | हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) आणि रोमारियो शेफर्ड (लखनऊ सुपर जायंट्स)
रिलीज केलेले खेळाडू | अर्शद खान, रमनदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेनसन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर