IPL 2024 | सूर्यकुमारशिवाय पलटण पहिल्या सामन्यात उतरणार! कशी असेल प्लेईंग ईलेव्हन?
IPL 2024 Mumbai Indians | सूर्यकुमार यादव याची बंगळुरुतील एनसीएमध्ये 19 मार्च रोजी फिटनेस टेस्ट झाली. सूर्यकुमार यादव या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला.
मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाचं बिगूल वाजलंय. हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर हंगामातील पहिलाच डबल हेडर सामना हा दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी पार पडणार आहे. या डबल हेडरमधील एक सामना हा मुंबई इंडियन्सचा असणार आहे. मुंबई इंडिन्यसचा हा या मोसमातील पहिला सामना असणार आहे. यंदा मुंबई इंडियन्स नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात खेळणार आहे. हार्दिक पंड्या आपल्या आधीच्या अर्थात गुजरात टायटन्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र त्याआधी कॅप्टन हार्दिकची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा बॅट्समन सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला पहिल्या सामन्यात सूर्याशिवाय उतरावं लागू शकतं. अशात मुंबईची प्लेईंग ईलेव्हन कशी असेल, जाणून घेऊयात.
आता सूर्यकुमार यादव नसेल, तर कॅप्टन हार्दिक पंड्या त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येऊ शकतो. हार्दिकने गेल्या 2 हंगामात गुजरात टायटन्ससाठी चौथ्या स्थानी बॅटिंग केली. हार्दिक गुजरातच्या बॅटिंगचा कणा होता. आता जोवर सूर्या पूर्णपणे बरा होत नाही, तोवर हार्दिकला जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. त्यामुळे हार्दिकला कॅप्टन्सीसह आणखी जबाबदारी बॅटिंग करावी लागेल.
सूर्याच्या जागी कुणाला संधी?
आता प्लेईंग ईलेव्हनमध्ये सूर्याच्या जागी नेहल वढेरा आणि विष्णू विनोद या दोघांपैकी कुणा एकाला संधी मिळू शकते. नेहल वढेरा याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण, नेहल डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यात पारंगत आहे. तसेच गरजेच्या क्षणी तो बॉलिंगही करु शकतो. त्यामुळे नेहल दोन्ही आघाड्यांवर कामगिरी करु शकतो.
ओपनिंग कोण करणार?
रोहित शर्मा आणि ईशान किशन ही जोडी पलटणसाठी ओपनिंग करु शकते. तिलक वर्मा वनडाऊन येऊ शकतो. कॅप्टन पंड्या चौथ्या स्थानी खेळेल. तर पाचव्या स्थानी नेहव वढेरा आणि सहाव्या क्रमांकावर ऑलराउंडर मोहम्मद नबी बॅटिंगला येऊ शकतो.
मुंबई इंडियन्सची संभावित प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहाल वढेरा, टिम डेविड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, आकाश मधवाल, नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमराह.