IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या दुखऱ्या बाजूवर सुनील गावस्कर यांनी ठेवलं बोट, म्हणाले…

आयपीएल स्पर्धेतील थरारक सामन्यांची अनुभूती आता पुढचे दोन महिने मिळणार आहे. जेतेपदासाठी प्रत्येक संघ जोर लावणार आहे. पण या स्पर्धेत काही संघांच्या कमकुवत बाजूही आहेत. मुंबई इंडियन्सबाबतही असंच काहीसं मत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू उघड केली आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या दुखऱ्या बाजूवर सुनील गावस्कर यांनी ठेवलं बोट, म्हणाले...
IPL 2024 : मुंबई इंडियन्स या बाजूने खाणार मार! सुनील गावस्कर यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 5:44 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. पुढचे दोन महिने क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी असणार आहे. आपल्या लाडक्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी चाहते सज्ज आहे. मुंबई इंडियन्सचे इतर फ्रेंचायसीच्या तुलनेत जास्त चाहते आहेत. मुंबई इंडियन्स संघात स्पर्धेपूर्वीच बदल पाहायला मिळाले आहेत. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याच्या हाती दिलं आहे. सहाव्यांदा जेतेपदासाठी रणनिती आखली गेल्याचं बोललं जात आहे. पण असं सर्व असताना मुंबई इंडियन्स संघासमोर एक चिंतेचा विषय आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार नाही. त्यात माजी क्रिकेट सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू उघड केली आहे. सुनील गावस्कर यांच्या मते, “मुंबई इंडियन्स संघाला डेथ ओव्हरमध्ये मजबूत फटका बसू शकतो.” त्याचं कारणही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, “डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं मुंबई इंडियन्सला कठीण जाईल. बुमराह आहे पण दुसऱ्या बाजूने धावा निघतील. त्यामुळे मुंबई इंडियन्सची ही कमकुवत बाजू आहे असं मला वाटतं. असं असलं तरी मुंबईच्या आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाजांना काही अंशी दिलासा मिळू शकतो.” बुमराहसोबत जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल किंवा अर्जुन तेंडुलकर यापैकी एक जण भूमिका बजावणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सशी आहे. 24 मोर्चला हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. हार्दिक पांड्या पहिलाच सामना पूर्वीच्या फ्रेंचायसी विरुद्ध खेळणार आहे. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 123 सामने खेळले आहेत. यात 145 च्या स्ट्राईक रेटने 2309 धावा केल्या आहेत. तर 53 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, विष्णू विनोद, नेहल वढेरा, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलदानी, शम्स मुलदानी , तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिक्ये, आकाश मधवाल, दिलशान मदुशंका, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, ल्यूक वुड, नमन धीर, शिवालिक शर्मा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.