IPL 2024 : मुंबई इंडियन्स पुढच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी चार खेळाडूंना करणार रिलीज? जाणून घ्या कोण

आयपीएल 2023 स्पर्धेतून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवात सर्वात कमकुवत बाजू दिसली ती गोलंदाजीची..त्यामुळे पुढच्या आयपीएलपूर्वी चार खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्स पुढच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी चार खेळाडूंना करणार रिलीज? जाणून घ्या कोण
IPL 2024 : आयपीएल 2023 स्पर्धेतील पराभवानंतर चार खेळाडूंना बसणार फटका, मिनी ऑक्शनमध्ये करणार रिलीजImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 10:11 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सने मुंबईला पराभूत करत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सचा पराभव टीम मॅनेजमेंटच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. मुंबईच्या फलंदाजीची गोष्टच निराळी आहे. जे इतर संघांना जमलं नाही ते मुंबईने या पर्वात चार वेळा करून दाखवलं आहे. 200 हून अधिक धावा चारवेळा चेस केल्या आहेत. पण यात मुंबईची गोलंदाजीची कमकुवत बाजू वारंवार अधोरेखित झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या टीममध्ये कमकुवत असलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचं जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच्या नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान दिलं जाणार आहे.

ख्रिस जॉर्डन : जोफ्रा आर्चर जखमी झाल्यानंतर ख्रिस जॉर्डनची संघात निवड करण्यात आली होती. डेथ ओव्हरमध्ये मुंबईला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्याच्याकडून अपेक्षा भंग झाला. त्यामुळे जॉर्डनला संघात घेणं मुंबईला चांगलंच महागात पडलं.

हृतिक शोकीन : हृतिक शोकीनने 2022 पर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे 2023 मध्ये त्याला खेळण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. पण आठ सामन्यात त्याने 23 धावा देत फक्त तीन गडी बाद केले. त्यामुळे त्याला संघात ठेवण्याबाबत मॅनेजमेंट दहावेळा विचार करेल.

आर्शद खान : मुंबई इंडियन्सला आर्शद खानकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये चांगलाच घाम गाळला. पण अनकॅप्ड प्लेयर आपली छाप सोडू शकला नाही. सहा सामन्यात 13.14 च्या इकोनॉमी रेटने त्याने 5 गडी बाद केले आहे.

ड्वेन जानसेन : मार्को जानसेनचा जुळा भाऊ ड्युआन जानसेनला मुंबई इंडियन्स रिलीज करण्याची शक्यता आहे. त्याने मुंबईसाठी फक्त एक सामना खेळला आहे. त्याने चार षटकात 1 गडी बाद करून 53 धावा दिल्या आहेत. मुंबई त्याला रिलीज करून त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली तर दोन वर्षांनी पुन्हा घेईल असं सांगण्यात येत आहे.

सध्याचा मुंबईचा संघ

रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन जानसेन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शोकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मढवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.