Rohit Sharma | “आज तो दिवस आहे जेव्हा…”, रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर ती पोस्ट व्हायरल

Rohit Sharma Mumbai Indians Captaincy | रोहित शर्मा याच्याकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Rohit Sharma | आज तो दिवस आहे जेव्हा..., रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर ती पोस्ट व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 8:40 PM

मुंबई | आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिने बाकी आहेत. त्याआधी दुबईत लिलाव पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याआधी कॅप्टन बदलला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून ती जबाबदारी हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. हार्दिक पंड्या याला काही दिवसांपूर्वीच ट्रान्सफर विंडोद्वारे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आलं. आता त्यानंतर थेट रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला एक नाही, दोन नाही, तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमातही प्लेऑफपर्यंत मजल मारली. कर्णधार कसा असावा याचं उत्तर आदर्श हा रोहितने घालून दिला होता. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सला एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवलं होतं. आयपीएल 2024 ऑक्शनची तयारी सुरु असताना अचानक कॅप्टन बदलण्याच्या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

“कोळश्याच्या शोधात मुंबई इंडियन्सने हिरा गमावला”, अशा आशयाची पोस्ट हार्दिक आणि रोहितच्या फोटोसह सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. तसेच एका नेटकऱ्याने रोहित शर्माचे आयपीएल ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट करत म्हटलंय की “आज तो दिवस आहे जेव्हा मला रोहित शर्माबद्दल वाईट वाटलेच तर अश्रूही आले. मी रोहितचा नुकताच चाहता झालो होतो. त्याला इतक्या लवकर आयपीएलमधील कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी काय केले नाही, त्याने पाच ट्रॉफी जिंकून दिल्या. तरीही त्याला दूधातील माशीप्रमाणे काढण्यात आला. एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, भांडवलशाहीला फक्त नफा समजतो भावना नाही.”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

ती पोस्ट व्हायरल

3 वर्षांपासून प्रतिक्षा

दरम्यान मुंबई इंडियन्सची गेल्या 3 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. मुंबई इंडियन्सला 2021 मध्ये प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. पलटण 2022 साली पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होती.

‘कोळश्याच्या नादात हिरा गमावला’

तर गेल्या हंगामात मुंबईने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी ही हार्दिकच्या खांद्यावर असणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.