IPL 2024 आधी लखनऊ सुपरजायंट्स संघाची कॅप्टनसीबाबत मोठी घोषणा, के.एल. राहुलला शोधला पर्याय!
IPL 2024 LSG New Vice Captain : आयपीएल सुरू हो्ण्यआधी सर्व संघ तयारीला लागलेले दिसत आहे. अशातच लखनऊ सुपर जायंट्स संघाने मोठा निर्णय घेतला आहे. के. एल. राहुल आता फिट नसेल तर टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : IPL 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत. बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं असून येत्या 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. त्याआधी तुल्यबळ संघांपैकी एक असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने मोठी घोषणा केलीये. लखनऊ संघाचा कर्णधार के.एल. कर्णधार आहे मात्र तो आयपीएलसाठी फिट होतो की नाही याबाबत संभ्रम आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. मात्र त्यासाठी लखनऊ टीम मॅनेजमेंटने आपला प्लॅन बी रेडी ठेवला आहे.
लखनऊचा काय असणार ‘प्लॅन बी’
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये के.एल. राहुल याला दुखापत झाली असून तो आता टीमबाहेर आहे. राहुल उपचारासाठी लंडनमध्ये गेल्याची माहिती समजत आहे. आयपीएल सुरू होण्याआधी जर तो बरा नाही झाला तर त्याची जागा कोण सांभाळणार? मागील आयपीएलमध्ये राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यावर त्याच्या जागी संघाची धुरा ही कृणाल पंड्याकडे देण्यात आली होती. यंदा लखनऊ संघाने त्यासाठी बॅकअप प्लॅन ठेवलाय.
लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी निकोलस पूरन याच्याकडे देण्यात आली आहे. जर के.एल. राहुल हा कॅप्टन म्हणून उपलब्ध नसेल तर पूरनकडे लखनऊच्या कॅप्टनसीची जबाबदारी असणार आहे. निकोलस पूरन याने टी-20 लीगमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे राहुल नसेल तर हा खेळाडू संघाचा कर्णधार असणार निश्चितच असणार आहे.
KL Rahul (C) Nicholas Pooran (VC)
This season feels special already 💙 pic.twitter.com/367JTTeSHL
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 29, 2024
एलएसजी पूर्ण संघ: के.एल. राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड. , यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, के गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद अर्शद खान.