CSK vs RCB आयपीएल 2024 : चेन्नईची विजयी सुरुवात, आरसीबीवर मात
Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore IPL 2024 Highlights in Marathi : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नईने आरसीबीचा पहिल्याच सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय. आरसीबी या पराभवासह यंदाही चेपॉकमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा श्रीगणेशा विजयाने केला आहे. सलामीचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. चेन्नईने आरसीबीकडून विजयासाठी मिळालेलं 174 धावांचं आव्हान हे सहज 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी अर्थात रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकार, संगीतकार आणि गायक सहभागी झाले. या कार्यक्रमानंतर सामन्याला सुरुवात झाली. आरसीबीने सीएसके विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने अनुज रावत याच्या 48 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 173 धावांपर्यंत मजल मारली. तर चेन्नईने प्रत्त्युतरात 18.4 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात चेन्नईने अशाप्रकारे विजय मिळवला.
LIVE NEWS & UPDATES
-
CSK vs RCB Live Score : चेन्नईचा 17 व्या मोसमात धमाकेदार विजय, सलामीच्या सामन्यात आरसीबीला नमवलं
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत जोरदार सुरुवात केली आहे. चेन्नईने विजयासाठी मिळालेल 174 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी करत चेन्नईला सहज विजय मिळवून दिला. शिवम आणि जडेजा या दोघांनी नाबाद 34 आणि 25 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही योगदान दिलं.
-
CSK vs RCB Live Score : धोकादायक डॅरेल मिचेल आऊट, चेन्नईची चौथी विकेट
चेन्नई सुपर किंग्सने चौथी आणि मोठी विकेट गमावलीय. आक्रमक फलंदाज डॅरेल मिचेल आऊट झाला आहे. डॅरेलने 18 बॉलमध्ये 22 धावा केल्या.
-
-
CSK vs RCB Live Score : रहाणे माघारी, सीएसकेला तिसरा धक्का, सामना रंगतदार स्थितीत
चेन्नई सुपर किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. ऋतुराज गायकवाड, रचीन रवींद्रनंतर अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. तसेच 19 बॉलमध्ये 27 धावा केल्या.
-
CSK vs RCB Live Score : रचीन रवींद्रच्या खेळीचा द एन्ड, सीएसकेला दुसरा झटका
सीएसकेने दुसरी विकेट गमावली आहे. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्यानंतर रचीन रवींद्र आऊट झाला. आहे. रचीनने तडाखेदार खेळी केली. रचीनने 15 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 37 धावा केल्या. रचीनला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र रचीन फटकेबाजी करण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला
-
CSK vs RCB Live Score : सीएसकेला मोठा धक्का, कॅप्टन ऋतुराज माघारी
सीएसकेने पहिली आणि मोठी विकेट गमावली आहे. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. ऋतुराजने 15 धावा केल्या.
-
-
CSK vs RCB Live Score : सीएसकेची शानदार सुरुवात, ऋतुराजचा कडक चौकार
सीएसकेने सलामीच्या सामन्यात आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली आहे. सीएसकेकडून कॅप्टन ऋचुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र ही सलामी जोडी मैदानात आली आहे. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगवर पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत अप्रतिम सुरुवात केली आहे.
-
CSK vs RCB Live Score : आरसीबीकडून सीएसकेला 174 धावांचं आव्हान
दिनेश कार्तिक आणि अनुज रावत या दोघांनी 6 विकेट्ससाठी केलेल्या 95 धावांच्या भागीदारीच्या जोरावर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे सीएसकेला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलंय. आरसीबीकडून अनुज रावत याने सर्वाधिक 48 धावा केल्या. अनुज शेवटच्या बॉलवर रन आऊट झाला. तर दिनेश कार्तिक याने नाबाद 38 धावा केल्या. तर सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
-
CSK vs RCB Live Score : अनुज रावत-दिनेश कार्तिकची निर्णायक भागीदारी, आरसीबीचं कमबॅक
आरसीबीने झटपट 5 विकेट्स गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक या दोघांनी डाव सावरत आरसीबीसाठी नाबाद 50 धावांची भागीदारी केली. अनुजने फटकेबाजी केली. तर तसेच दिनेश कार्तिकने त्याला चांगली साथ दिली.
-
CSK vs RCB Live Score : आरसीबीला पुन्हा एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
आरसीबीने फाफ डु प्लेसीस-रजत पाटीदार यांच्यानंतर पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या आहेत. विराट कोहली याच्यानंतर कॅमरुन ग्रीन आऊट झाला. त्यामुळे पुन्हा एकदा नवी जोडी मैदानात आहे.
-
CSK vs RCB Live Score : विराट-ग्रीनवर मोठी जबाबदारी, आरसीबीच्या 10 ओव्हरनंतर 75 धावा
आरसीबीने चेन्नई विरुद्ध सलामीच्या सामन्यात पहिल्या 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन दोघेही नाबाद खेळत आहेत. तर कॅप्टन फाफ डु प्लेसीसस 35 धावा करुन माघारी परतला. तर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.
-
CSK vs RCB Live Score : ग्लेन मॅक्सवेल झिरोवर आऊट, निराशाजनक सुरुवात
आरसीबीला तिसरा झटका लागला आहे. रजत पाटीदार याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल हा देखील झिरोवर आऊट झाला आहे. अशाप्रकारे आरसीबी चांगल्या सुरुवातीनंतर बॅकफुटवर गेली आहे.
-
CSK vs RCB Live Score : आरसीबीला झटपट 2 झटके
आरसीबीला जोरदार सुरुवातीनंतर झटपट 2 झटके लागले आहेत. मुस्तफिजुर रहमान याने एकाच ओव्हरमध्ये आरसीबीला कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदार या दोघांना आऊट केलं. फाफने 35 धावा केल्या, तर रजत पाटीदार याला भोपळाही फोडता आला नाही.
-
CSK vs RCB Live Score | आरसीबीची जोरात सुरुवात, फाफची फटकेबाजी
आरसीबीने 17 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात जोरदार सुरुवात केली आहे. कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या दोघांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये 37 धावा केल्या आहेत.
-
सामन्याला सुरुवात, आरबीसीची बॅटिंग, पहिलाच बॉल वाईड
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सलामीच्या सामन्याला वाईड बॉलने सुरुवात झालीय. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस सलामी जोडी मैदानात आली. सीएसकेकडून दीपक चाहर याने हंगामातील पहिलाच बॉल वाईड टाकला. त्यामुळे हंगामातील पहिली धाव ही अतिरिक्त स्वरुपात आली.
-
सीएसके आणि आरसीबीची प्लेईंग ईलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षना, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.
-
आरसीबीने टॉस जिंकला
आरसीबीने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात टॉस जिंकलाय. आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने सीएसके विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
बीसीसीआय पदाधिकारी, कलाकार आणि कर्णधार मंचावर
आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी रंगारंग कार्यक्रम मोठ्या धमाक्यात पार पडला. त्यानंतर आता अक्षय कुमार,टायगर श्रॉफ, सोनू निगम, एआर रहमान, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, अरुण धुमल, राजीव शुक्ला, आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस मंचावर जमले. तर अखेरीस सीएसकेचा नवनिर्वाचित कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएल ट्रॉफी घेऊन मंचाव पोहाचला. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
-
अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा धमाका, सोनू निगम-एआर रहमानने मनं जिंकली
आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या रंगारंग कार्यकमाची जोरदार सुरुवात झाली आहे. बॉलिवूड कलाकार आणि गीतकारांनी दणक्यात सुरुवात केली. आधी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांनी जोरदार सुरुवात केली. त्यानंतर सोनू निगम आणि एआर रहमान या दोघांनी विविध गाण्यांनी मनं जिंकली.
-
एआर रहमानने ‘माँ तुझे सलाम’ गाण्याने जिंकली मनं
सोनू निगमनंतर एआर रहमान याने ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तीपर गाण्याने चाहत्यांची मनं जिंकली.
-
सोनू निगमने जिंकली मनं
अक्षय कुमार-टायगर श्रॉफ यांच्यानंतर सोनू निगम याने आवाजाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये उपस्थितांची मनं जिंकली. सोनू निगमने ‘वंदे मातरम’ गाणं गायलं.
-
मिस्टर खिलाडी अक्षय कुमार देसी बॉयजवर थिरकला
अभिनेता अक्षय कुमार याने ‘देसी बॉयज’ या सिनेमातील ‘सुबह होने न दे’ गाण्यावर परफॉर्म केला. त्यानंतर अक्षय कुमार ‘भूल भुलैया’ या गाण्यावर थिरकला. तसेच ‘पार्टी ऑल नाईट’ आणि चुरा के दिल मेरा गोरिया चली गाण्यावर परफॉर्म केला.
-
अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांकडून रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात
आयपीएल 17 व्या मोसमाच्या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांनी ‘सारे जहा से अच्छा’ या गाण्याने केली. त्यानंतर हबीबी या गाण्यावर डान्स केला. तसेच टायगर हबीबी गाण्यावर थिरकला.
-
नवज्योत सिंहू सिद्धू यांची एन्ट्री, कॉमेंट्रीने लावणार चार चाँद
टीम इंडियाचे माजी खेळाडू नवज्योत सिंह सिद्धू यांचं कॉमेंटेटर म्हणून पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सलामीच सामना हा सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. त्याआधी ब्रॉडकास्टर्सच्या खास कार्यक्रमात नवज्योत सिंह सिद्धू यांची एन्ट्री झाली. यावेळेस अनेक प्रेझेंटेटर्सने त्यांचं स्वागत केलं. तसेच सिद्धू यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात शायरीने सुरुवात केली.
कॉमेंट्रीचा सरदार परतला
Navjot Singh Sidhu is back for the IPL. 🔥pic.twitter.com/PxOdddUuWC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 22, 2024
-
रंगारंग कार्यक्रमासाठी एमए चिदंबरम स्टेडियममध्येबाहेर चाहत्यांची गर्दी
आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. सलामीच्या सामन्याआधी होणाऱ्या ओपनिंग सेरेमनीसाठी एमए चिदंबरम स्टेडियमबाहेर चाहत्यांची एकच गर्दी झाली आहे.
-
IPL 2024 Opening Ceremony Live : ओपनिंग सेरेमनीत कोणकोणते कलाकार?
आयपीएल 2024 च्या रंगारंग कार्यक्रमात ‘मिस्टर खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ परफॉर्म करणार आहेत. तर सोबतच एआर रहमान आणि सोनू निगम हे दोघे खास गाणी सादर करणार आहेत.
ओपनिंग सेरेमनीत कलाकार करणार कल्ला
The stage is set, the lights are bright, and the stars are ready to shine at the #TATAIPL 2024 Opening Ceremony! 🎉🥳
Get ready for an unforgettable fusion of cricket and entertainment ft. a stellar lineup! ✨
🗓22nd March ⏰6:30 PM onwards pic.twitter.com/7POPthFITx
— IndianPremierLeague (@IPL) March 20, 2024
-
IPL 2024 Opening Ceremony Live : थोड्याच वेळात आयपीएल ओपनिंग सेरेमनीला सुरुवात
आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या सुरुवातीआधी रंगारंग कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपली कलाकारी दाखवणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना हा कार्यक्रम जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे.
Published On - Mar 22,2024 4:51 PM