PBKS Vs SRH : सिंह इज किंग, अर्शदीपचा धमाका, पॅट कमिन्सचा रेकॉर्ड ब्रेक
IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने खास रेकॉर्ड केलाय.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने सनरायर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धमाका केलाय. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन याने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन धवनचा निर्णय पंजाबच्या गोलंदाजांनी काही अंशी खरा ठरवला. पंजाबचा बॉलर अर्शदीप सिंह याने बॉलिंग दरम्यान मोठा रेकॉर्ड केला. अर्शदीपने थेट हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स यालाच दणका देत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
अर्शदीप सिंह याने हैदराबाद विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने एका ओव्हरमध्ये हैदराबादला 2 तगडे झटके दिले. अर्शदीपने पहिल्या ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड आणि एडन मारक्रम या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने यासह टी 20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पार केला. अर्शदीपने हेड आणि मारक्रम या दोघांव्यतिरिक्त नितीश रेड्डी आणि अब्दुल समद या दोघांनाही बाद केलं.
अर्शदीपने आतापर्यंत 123 सामन्यांमध्ये आयपीएलमधील 123 सामन्यांमध्ये 150 विकेट्स पूर्ण केल्या. अर्शदीपने यासह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला मागे टाकलं. पॅटने 134 सामन्यांमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पार केला होता. अर्शदीपने पॅटच्या तुलनेत एक सामन्याआधी 150 विकेट्स पूर्ण करत पुढे निघाला आहे.
अर्शदीप सिंह याच्या 150 विकेट्स पूर्ण
1️⃣5️⃣0️⃣ wickets done, many more to come!💪
An important milestone in a stupendous T20 career! 🔥#ArshdeepSingh #SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #PBKSvSRH pic.twitter.com/VsRcQv8hs5
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 9, 2024
पंजाबसमोर 183 धावांचं आव्हान
दरम्यान हैदराबादने पंजाबला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. हैदराबादकडून नितीश रेड्डी याने 37 बॉलमध्ये सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर अब्दुल समद 25 आणि ट्रेव्हिस हेड याने 21 धावांचं योगदान दिलं.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.