IPL 2024, PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबादने फक्त 2 धावांनी पंजाब किंग्सला नमवलं
आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने धावांनी जिंकला. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करणं पंजाबला शक्य झालं नाही. पंजाब किंग्सचा डाव 20 षटकात 180 धावांवर आटोपला.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 23 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्सला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले होतं. नितीश रेड्डी याने हैदराबाद संघाकडून सर्वाधिक 64 धावा केल्या. त्यामुळे हैदराबाद संघाला इतकं मोठं आव्हान देणं शक्य झालं. हैदराबादने दिलेलं 183 धावांचं आव्हान गाठताना पंजाब किंग्सची दमछाक झाली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टप्प्याटप्याने संघावर दडपण वाढत होतं. चेंडू आणि धावांमधील अंतर कमी करणं कठीण झालं आणि अखेर हैदराबादने सामन्यावर पकड मिळवली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने चांगलं षटक टाकलं. चार षटकांपैकी एक षटक निर्धाव टाकत 2 गडी बाद केले. पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावा केल्या. अवघ्या 2 धावांनी पंजाब किंग्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटी जबरदस्त खेळी केली. पण विजय मिळवून देण्यात अपयश आलं.
जॉनी बेअरस्टोला मोठी खेळी करता आली नाही.खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला बाद करून सनरायझर्स हैदराबादला दुसरे यश मिळवून दिले.शिखर धवनने 16 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.सॅम करन 22 चेंडूत 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टी नटराजनने बाद केले. सिकंदर राजाही संघाला विजयाच्या वेशीवर नेऊ शकला नाही. 28 धावा करून बाद झाला. जितेश शर्माकडून अपेक्षा होत्या मात्र तोही 19 धावा करून परतला. पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंगने चार षटकांत 29 धावा देत 4 बळी घेतले. हर्षल पटेल आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.