KKR vs SRH Toss: हैदराबादने कोलकाता विरुद्ध निर्णायक सामन्यात टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची?
KKR vs SRH Qualifier 1 Toss : सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकला आहे.
आयपीएलच्या साखळी फेरीनंतर आज 21 मे पासून प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होत आहे. प्लेऑफमधील पहिल्या अर्थात क्वालिफायर 1 सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन आहे. तर श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होईल. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. सनरायजर्स हैदराबादनेटॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
केकेआर हैदराबादवर वरचढ
हेड टु हेड रेकॉर्ड्स पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स सनरायजर्स हैदराबादवर वरचढ राहिली आहे. आयपीएलच्या इतिहासात केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यात एकूण 26 सामने झाले आहेत. या 26 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स वरचढ राहिली आहे. कोलकाताने हैदराबादवर 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने केकेआरवर 9 वेळा मात केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांनी या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही कर्णधारांनी आपल्यात त्याच 10 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. केकेआरकडून फिलिप सॉल्ट याच्या अनुपस्थितीत रहमानुल्लाह गुरुबाज यहा ओपनिंग करणार आहे. बरेचसे खेळाडू हे मायदेशी परतले आहेत. त्यामुळे रहमानुल्लाह सॉल्टच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर सुनील नरीन याच्यासह रहमानुल्लाह ओपनिंगला येणार आहे.
दरम्यान हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला एक आणखी संधी मिळणार आहे. एलिमिनेटर जिंकणारी टीम क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी भिडेल. क्वालिफायर 2 हा सामना सेमी फायनल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे केकेआर विरुद्ध हैदराबाद हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
हैदराबादने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Sunrisers Hyderabad elect to bat against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/LXVNHfhhp3
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.