IPL 2024 : राजस्थानला सलग चौथ्या पराभवामुळे दुप्पट टेन्शन, दुसरं स्थान धोक्यात
IPL 2024 Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आपल्या पहिल्या 9 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला. मात्र त्यानंतर राजस्थानने सलग 4 सामने गमावले. त्यामुळे राजस्थानचं प्लेऑफमध्ये पोहचूनही टेन्शन वाढलं आहे.
सॅम करन याने केलेल्या नाबाद 63 धावांच्या मदतीने पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने पंजाबसमोर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 18.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. पंजाबने सलग 2 पराभवानंतर विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. तर राजस्थानची ही सलग चौथा सामना गमावण्याची वेळ ठरली. राजस्थानच्या या सलग चौथ्या पराभवामुळे टेन्शन वाढलं आहे.
पंजाबने राजस्थानवर मात करत पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला पछाडत नवव्या स्थानी झेप घेतली आहे. तर पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी कायम आहे. राजस्थानचा यानंतर आणखी एक सामना बाकी आहे. राजस्थानला प्लेऑफमधील दुसरं स्थान कायम राखायचं असेल, तर अखेरचा आणि 14 वा सामना हा जिंकावा लागेल. राजस्थान 19 मे रोजी आपला साखळी फेरीतील अखेरचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. केकेआरचा सुद्धा हा अखेरचा सामना असणार आहे.
राजस्थानचं टेन्शन वाढलं
तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर 13 सामन्यांमध्ये 7 विजयासह 14 गुण आहेत. चेन्नई तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईने अखेरचा सामना जिंकला, हैदराबादने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला आणि राजस्थानने अखेरचा सामना गमावला तर राजस्थान चौथ्या स्थानीही फेकली जाऊ शकते. कारण सीएसकेचा नेट रनरेट हा राजस्थानपेक्षा सरस आहे. सीएसकेचा नेट रनरेट हा +0.528 इतका आहे तर राजस्थानचा +0.273 असा आहे. त्यामुळे आता इथून राजस्थानाठी पुढील प्रत्येक सामना दुसऱ्या स्थानच्या हिशोबाने अग्निदिव्यच असणार आहे.
त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी एलिमिनेटर सामना होता. हा सामना जिंकलेला संघ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध खेळतो. हा सामना असतो क्वालिफायर 2. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिल्यास 2 सामने जिंकून फायनलमध्ये पोहचता येतं. तर टॉप 2 मध्ये राहिल्यास अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोनदा संधी मिळते. अशात आता दुसऱ्या स्थानी राजस्थान कायम राहतं की हैदराबाद गेम बदलतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.