Mission IPL 2024 : अखेर RCB नेही भाकरी फिरवली, टीम मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय
आयपीएलमधील एकही सीझनमध्ये आतापर्यंत आरसीबी संघाला फायनल जिंकता आली नाही. संघामध्ये तोडीस तोड खेळाडूंचा भरणा असूनही संघाला प्रत्येकवेळी अपयश आलं आहे. मात्र आता टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही विजेतेपद न पटकावणाऱ्या आरसीबीने (Royal Challengers Bangalore) मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील एकही सीझनमध्ये आतापर्यंत आरसीबी संघाला फायनल जिंकता आली नाही. संघामध्ये तोडीस तोड खेळाडूंचा भरणा असूनही संघाला प्रत्येकवेळी अपयश आलं आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर फाफ डू प्लेसिसकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला होता मात्र तरीसुद्धा काही यश आलं नाही. मात्र आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमका कोणता निर्णय घेतलाय?
आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यात आली आहे. अँडी फ्लॉवर असं नव्याने निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे. याआधीचे कोच संजय बांगर आणि माईक हेसन यांचा कार्यकाल संपला आहे. आरसीबीच्या ट्विटर हँडलवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
आरसीबीचे ट्विट:-
Their professionalism and work ethics have always been held in high regard. A number of youngsters were given a platform to learn and succeed in the last four years. ?#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/47IH78lR59
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 4, 2023
अँडी फ्लॉवर यांनी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय आणि फँचायझी क्रिकेट संघाचं प्रशिक्षपद सांभाळलं आहे. मुळचे झिम्बाब्बे असलेल्या अँडी फ्लॉवर यांनी पीएसएल, द हंड्रेट, आयएलटी 20, टी-10 या लीगमध्येही प्रशिक्षकपदावर काम केलं आहे. इंग्लंड संघासाठी ते यशस्वी प्रशिक्षक राहिले आहेत. इंग्लंडने 2010 मध्ये टी- 20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी ते संघाचे कोच म्हणून कार्यरत होते. आयसीसीकडून हॉल ऑफ फेम होणारे ते झिम्बाब्बेचे पहिले खेळाडू ठरले आहेत.
माईक हेसन आणि संजय बांगर यांचे आभार, गेल्या चार वर्षांमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनाही यश आलं. या दोघांचा आता कार्यकाळ संपला असून माईक हेसन आणि संजय बांगर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ्या, असं ट्विट करत आरसीबीने दोघांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, आरसीबीने आता आयपीएल 2024 डोळ्यासमोर ठेवत नव्यान संघ बांधणीची तयारी सुरू केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आतातरी आयपीएलमध्ये आरसीबीला यश येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.