IPL 2024 Playoff : आरसीबी चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये खेळणार! सनरायझर्स हैदराबादचा पत्ता कट?
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. गुण सारखेच होण्याची चिन्हं असल्याने नेट रनरेट बरंच काही ठरवणार आहे. आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 18 मे रोजी सामना होणार आहे. या सामन्यावर बरंच काही ठरणार आहे. पण या सामन्यापूर्वीच हरभजन सिंहने मोठा दावा केला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने स्थान पक्कं केलं आहे. मात्र इतर संघांचं अजून काही ठरलेलं नाही. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये खेळेल असं चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्या चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रस्सीखेच आहे. प्लेऑफसाठी चुरस असताना आयपीएलमध्ये समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने प्लेऑफबाबत मोठं भाकीत केलं आहे. हरभजन सिंग यांच्या मते, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवतील. इतकंच काय प्लेऑफच्या शर्यतीतून सनरायझर्स हैदराबाद बाहेर जाईल असंही भाकीत केलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हरभजन सिंगच्या मते सनरायझर्स हैदराबादचं प्लेऑफमध्ये जाणं खूपच कठीण आहे. हा संघ चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत आहे. मात्र कठीण काळात सनरायझर्सच्या शैलीचं क्रिकेट चालणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. हरभजन सिंगने अनेकदा लाईव्ह समालोचनावेळी सनरायझर्स हैदराबादवर टीकास्त्र सोडलं आहे. पण ही टीम प्लेऑफच्या खूपच जवळ आहे. हैदराबादचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पण हरभजन सिंगचं म्हणणं काही वेगळंच आहे. चेन्नई आणि आरसीबी हे दोन संघ प्लेऑफमध्ये जातील. या दोन्ही संघांचा 18 मे रोजी सामना आहे.
हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात दावा केला की, आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्स नाव कोरेल. कोलकात्याने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. त्यात टॉप 2 मधील स्थानही पक्क आहे. दुसरीकडे, कोलकात्याचा महत्वाचा खेळाडू फिल सॉल्ट प्लेऑफच्या सामन्यापूर्वी मायदेशी परतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला नुकसान होऊ शकतो. असं असलं तरी टीममध्ये सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, आंद्रे रस्सेलसारखे खेळाडू आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन, अल्लाह गझनफर