RCB vs CSK Head To Head Stats: आरसीबी विरुद्ध चेन्नई यांच्यात वरचढ कोण? आकडेवारी कुणाची भारी?
RCB vs CSK Head To Head Stats Marathi News : आरसीबी आणि चेन्नई दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. विजयी संघ थेट प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 18 मे रोजी होणारा सामना हा महामुकाबल्यापेक्षा रंगतदार असणार आहे. उभयसंघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. हेच दोन्ही संघ या 17 व्या हंगामातील सलामीचा सामना खेळले होते. चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीवर मात करत या हंगामाची विजयी सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने आपल्या कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केली. आता चेन्नई आरसीबीला घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पराभूत करणार का, हा मोठा प्रश्न असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही आरपारची लढाई असणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील आयपीएलमध्ये कामगिरी कशी राहिलीय, हे जाणून घेऊयात.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत एकूण 32 सामने झाले आहेत. या 32 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये धोनीची चेन्नई विराटच्या आरसीबीवर वरचढ राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीला 10 वेळा विजय मिळवण्या यश आलं आहे. तर एकमात्र सामना हा रद्द झाला. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने चेन्नईच सरस आहे. मात्र आरसीबी घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे आरसीबीसाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, रजत पाटीदार, अनुज रावत, यश दयाल, विजयकुमार वैशाख, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन ग्रीन, मनोज भंडागे आणि आकाश दीप.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), एमएस धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दूल ठाकुर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.