RCB vs CSK: आरसीबी विरुद्ध सीएसके सामना पावसामुळे रद्द झाल्यास प्लेऑफचं तिकीट कुणाला?

IPL 2024 RCB vs CSK Playoffs Scenario : आयपीएलच्या 17 व्या हंगामात 2 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर 2 जागांसाठी काही संघांमध्ये जोरदार चढाओढ आहे.

RCB vs CSK: आरसीबी विरुद्ध सीएसके सामना पावसामुळे रद्द झाल्यास प्लेऑफचं तिकीट कुणाला?
rcb vs csk ipl 2024
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 5:19 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या 2 संघांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता 2 जागांसाठी बाहेर झालेल्या 3 संघांचा अपवाद वगळता उर्विरित टीम्समध्ये जोरदार चुरस आहे. या प्लेऑफच्या हिशोबाने शनिवारी 18 मे रोजी आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यात होणार सामना फार निर्णायक आहे. या सामन्याने प्लेऑफमध्ये कोण पोहचणार आणि कुणाचं आव्हान संपुष्टात येणार हे स्पष्ट होईल. या सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबी सध्या जोरदार कामगिरी करत इथवर आली आहे. आरसीबीने सलग 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर प्लेऑफसह आरसीबीचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोण प्लेऑफमध्ये पोहचणार? हे आपण जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात आरसीबीसाठी हा करो या मरो असा सामना आहे. तर चेन्नईकडे प्लेऑफसाठी आणखी एक पर्याय आहे. हैदराबादचे आणखी 2 सामने बाकी आहेत. हैदराबादचा दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास चेन्नईचा प्लेऑफ खेळण्याचा मार्ग सोपा होईल. मात्र आरसीबीकडे विजयाशिवाय पर्याय नाही. तर हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास आरसीबीचं आव्हान इथेच संपुष्टात येईल, तर चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

आरसीबीने या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. आयरीसीबने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आरसीबी 6 विजय आणि 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर चेन्नईने 13 पैकी 7 सामने जिंकलेत. चेन्नई 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 पॉइंट मिळेल. अशात चेन्नईचे 15 गुण होतील. चेन्नई यासह प्लेऑफमध्ये पोहचेव. तर आरसीबीचे 13 गुण होतील. तर हैदराबादच्या खात्यात आधीच 14 गुण आहेत. त्यामुळे हैदराबादने पुढील दोन्ही सामने गमावले, तरीही आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचू शकणार नाही.

बंगळुरुत 18 मे रोजी जोरदार पावसाची शक्यता

आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, अनुज रावत, यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरून , मनोज भंडागे आणि आकाश दीप.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.