RCB vs CSK : विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महारेकॉर्ड

Virat Kohli RCB vs CSK : विराट कोहली याने आरसीबीच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे.

RCB vs CSK : विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महारेकॉर्ड
m s dhoni and virat kohli rcb vs csk ipl 2024Image Credit source: m s dhoni and virat kohli rcb vs csk ipl 2024
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 9:08 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 29 बॉलमध्ये 162.07 च्या स्ट्राईक रेटने 47 धावांची झंझावाती खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. विराटचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र विराटने त्याला रनमशीन का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. तसेच विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणार पहिलाच फलंदाज ठरला आहे.

‘विराट’ महारेकॉर्ड

विराट कोहलीने 13 धावा पूर्ण करताच महारेकॉर्ड केला. विराट आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानात 3 हजार धावा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराटने आरसीबीच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडे याच्या बॉलिंगवर 98 मीटर लांब खणखणीत सिक्स ठोकला. विराटने मारलेला फटका हा छताला लागला. विराटने यासह आपल्या 3 हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या नावावर या सिक्ससह चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 3 हजार 5 धावा पूर्ण झाल्या. विराटनंतर एकाच स्टेडियममध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहितने वानखेडे स्टेडियम या आपल्या होम ग्राउंडमध्ये 2 हजार 295 धावा केल्या आहेत. तर एबी डी व्हीलियर्स याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1 हजार 960 धावा केल्या आहेत.

दरम्यान विराट आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.4 ओव्हरमध्ये 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट आऊट झाला. आता फाफ डु प्लेसीस आणि इतर फलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

विराट कोहलीचा महारेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.